SSC Stenographer Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोगाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या १२०७ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – स्टेनोग्राफर
एकूण रिक्त पदे – १२०७
पदाचे नाव व रिक्त पदे –
- स्टेनोग्राफर ग्रेड C – ९३
- ग्रेड D – १११४
शैक्षणिक पात्रता – १२ वी पास.
हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! टपाल विभागात तब्बल ३१५४ जागांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा
वयोमर्यादा –
ग्रेड C – १८ ते ३० वर्षे.
ग्रेड D – १८ ते २७ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी – १०० रुपये.
- मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ८ ऑगस्ट २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०२३
अधिकृत बेवसाईट – https://ssc.nic.in/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या (https://drive.google.com/file/d/1YefVpUrxver54rtWvs9DzRijqJRKmj_U/view) लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.