सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या भरतीअंतर्गत एकूण ५१२ जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” या पदांच्या एकूण ५१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे.

हेही वाचा- बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! BMC मध्ये होतेय ११७८ जागांसाठी मेगाभरती; ‘ही’ आहे अर्ज करायची शेवटची तारीख

पदाचे नाव – लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी.

पदसंख्या – ५१२

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०२३

निवड प्रक्रिया – मुलाखती

अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in

पदाचे नाव पद संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी)
लघुटंकलेखक
१६
जवान, राज्य उत्पादन शुल्क३७१
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क
७०
चपराशी ७०

शैक्षणिक पात्रता –

लघुलेखक (निम्नश्रेणी) –

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  • लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट
  • मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.

लघुटंकलेखक –

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट
  • मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

जवान, राज्य उत्पादन शुल्क –

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क –

  • इयत्ता ७ वी उत्तीर्ण
  • वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)

चपराशी –

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1IF7c3mU3y1W53rUd_kv7VNIa4AkJadGd/view या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.