AFCAT 2023: भारतीय हवाई दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय हवाई दलाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कमिशंड ऑफिसर या पदांसाठीच्या २७६ या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ असून भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कोर्सचे नाव – भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा – 02/2023/NCC स्पेशल एंट्री.
हेही वाचा – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, ५ जूनपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
पदाचे नाव – कमीशंड ऑफिसर
एकूण रिक्त पदे – २७६
शैक्षणिक पात्रता –
AFCAT एंट्री- फ्लाइंग – ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.E/ B.Tech.
AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण + ६० टक्के गुणांसह B.E/ B.Tech.
AFCAT एंट्री – (नॉन टेक्निकल) – ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Com/ ६० टक्के गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स).
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग – NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
वयोमर्यादा –
फ्लाइंग ब्रांच – उमेदवाराचा जन्म २ जुलै २००० ते १ जुलै २००४ च्या दरम्यानचा असावा.
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल/ नॉन टेक्निकल) – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९८ ते १ जुलै २००४ दरम्यानचा असावा.
अर्ज शुल्क –
AFCAT एंट्री – 250 रुपये.
NCC स्पेशल एंट्री आणि मेट्रोलॉजी एंट्री – फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत वेबसाईट – https://afcat.cdac.in/AFCAT/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ जून २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1FSQrlOQMvHKetAbopSMvZssFsoSPu-yd/view) या लिंकला अवश्य भेट द्या.