गट क सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकातील संकल्पनात्मक भागाच्या तयारीबाबत या लेखामध्ये पाहू. अर्थव्यवस्था विषयाच्या संकल्पना व संज्ञा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या विषयाच्या संकल्पना परस्परांशी घनिष्ठपणे संबंधित असतात. त्यामुळे तुलनात्मक (comparative) अभ्यासाने हा विषय सोपा होऊ शकतो. मूलभूत संकल्पना आणि व्याख्या समजणे या विषयाच्या तयारीसाठीची अट आहे. या तयारीसाठी NCERT ची १० वी १२ वी ची अर्थव्यवस्थेची पाठ्यपुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

समग्रलक्षी अर्थशास्त्र वृद्धी व विकास:

राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, स्थूल मूल्यवर्धन, स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक या संकल्पना उदाहरणांसहित समजून घ्यायला हव्यात. या संकल्पनांचा तुलनात्मक अभ्यास करणे विषय समजून घेण्यासाठी जास्त फायद्याचे ठरते.

mpsc secretary on postpone exams marathi news
‘एमपीएससी’च्या १८ आणि २५ ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यावर आयोगाच्या सचिव काय म्हणाल्या?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
MPSC, MPSC notice, MPSC Exam,
‘एमपीएससी’ : २५ ऑगस्टच्या संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्त्वाची सूचना
MPSC, MPSC combine exam,
‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…
Big update regarding MPSC Prelims Exam
‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट… अखेर तारीख…
MPSC welfare examination update news
एमपीएससीच्या समाजकल्याण परीक्षेबाबत मोठी अपडेट; या तारखेपर्यंत हरकती….
atul londhe Congress
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरून काँग्रेस आक्रमक, आयोग म्हणाले परीक्षा पुढे….
MPSC Students Protest in Pune
MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी सरकार मान्य करणार? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ आश्वासन

राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, त्यातील समस्या, व्यापारचक्रे यांचा कालानुक्रमे अभ्यास करणे व्यवहार्य ठरते. समस्यांची कारणे, स्वरूप, परिणाम, उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा.

रोजगाराची संकल्पना समजून घेऊन तिचा भारतीय अर्थव्यवस्थेमधील संबंधित मुद्द्यांबरोबरच अभ्यास करणे व्यवहार्य आहे.

राष्ट्रीय उत्पन्न, ते मोजण्याच्या पद्धती, साधने, चलनवाढ आणि महागाईबाबतचे सिद्धांत, कारणे, परिणाम, उपाय यांचा अभ्यास NCERT पुस्तकांमधून करावा.

हेही वाचा >>> Success Story: गावात किराणा मालाच्या दुकानापासून ते कोट्यावधींची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

सार्वजनिक वित्त

बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची / आयव्ययाची भूमिका (बाजार अपयश व विकासानुकूलता)- सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू या संकल्पना समजून घेऊन त्यांचा परस्परसंबंध लक्षात घ्यावा. तुलनात्मक पद्धतीने या मुद्द्यांचा अभ्यास करणे परिणामकारक ठरते.

सार्वजनिक वित्त घटकामध्ये अर्थसंकल्प हा मुद्दा मध्यवर्ती ठेवून संबंधित सर्व संकल्पना समजून घेतल्यास अवघड किंवा बोजड वाटणार नाहीत. अर्थसंकल्पाचे प्रकार, त्याच्या मंजुरीची प्रक्रिया, महसूल, महसुलाचे स्राोत- (केंद्रीय व राज्यस्तरीय) कर रचना कर सुधारणांचे समीक्षण – मूल्यवर्धित कर – वस्तू व सेवा कर या संकल्पना नीट समजून घ्यायला हव्यात.

अंदाजपत्रकीय, राजकोषीय, वित्तीय तुटी इत्यादी तुटीचे प्रकार, त्यांचे स्वरूप, त्यांची कारणे, परिणाम, उपाय या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. पण त्या बरोबरच याबाबतच्या चालू घडामोडी अथात याबाबतचे शासकीय तसेच फइकचे निर्णय, आकडेवारी माहीत असायला हवी.

सार्वजनिक खर्चाचे (केंद्रीय व राज्यस्तरीय) प्रकार, यांतील घटक, त्यांचे प्रमाण, त्यांचे स्वरूप, त्यांच्या वृद्धीची कारणे, परिणाम, समस्या, उपाय, सार्वजनिक खर्च सुधारणेसाठीचे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

सार्वजनिक कर्जाचे प्रकार यांतील घटक, त्यांचे प्रमाण, त्यांचे स्वरूप, त्यांच्या वृद्धीची कारणे, परिणाम, समस्या, उपाय असे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

भारतातील वित आयोग, राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या समस्या, भारतातील वित्तीय सुधारणा हे मुद्दे पारंपरिक आणि गतिमान अशा दोन्ही बाजूंनी महत्त्वाचे आहेत. त्यांचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. मूलभूत मुद्दे समजून घेऊन याबाबतच्या चालू घडामोडींची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था या उपघटकाचा अभ्यास त्यामध्ये नमूद प्रत्येक मुद्दा मूलभूतपणे समजून घेऊन करणे आवश्यक आहे. याबाबत संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तसेच हा भाग नियमितपणे अपडेट करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक पाहणी अहवालामध्ये याबाबत होणारी चर्चा, नवे मुद्दे, संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल:

वृद्धीचे इंजिन स्वरुपात आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अर्थव्यवस्थेतील वृद्धीमधील महत्त्व/ योगदान आणि वृद्धीतील परकीय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका अशा अर्थाने अभ्यासावा.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अभिजात व आधुनिक सिद्धांत हे सिद्धांत तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून उदाहरणांच्या आधारे अभ्यासले तर समजणे व लक्षात ठेवणे सोपे होईल.

आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था आणी क्षेत्रीय व्यापार करार यांचा अभ्यास पुढ़ील मुद्द्यांच्या आधारे करावा:

स्थापनेमागील हेतू, उद्दीष्टे, स्थापनेचे वर्ष, भारत सदस्य आहे का? असल्यास भारताची यांमधील भूमिका, त्यांचे आंतरराष्ट्रीय व भारतासाठीचे योगदान

जागतिक व्यापार संघटनेची आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणुकीमधील भूमिका, तिचे नियम, याबाबत उद्भवणारे मुद्दे, व चालू घडामोडी पहायला हव्यात. या अनुषंगानेच व्यापारविषयक बौद्धिक संपदा आणि व्यापारविषयक गुंतवणूक उपाय हे मुद्दे अभ्यासावेत.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com