डॉ श्रीराम गीत

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर वेगवेगळे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याचं वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. या लेखात खेळाकडे आणि त्यावरील करिअरकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

भारतातल्या प्रत्येकाला क्रिकेटचे वेडच आहे. ज्याला क्रिकेट आवडत नाही, अशा माणसाकडे काय वेडगळ आहे म्हणून इतर लोक बघतात. गल्लीबोळात, मोठ्या मैदानात, सोसायटीच्या मोकळ्या जागेत किंवा पार्किंग सारख्या कोंदट जागेत सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विविध वयोगटातील मुले, मोठी माणसे जमेल त्या साधनाने क्रिकेटमध्ये रंगून जातात. पण ९५ टक्के टेनिसचा बॉल हेच साधन असते, तर बॅट म्हणून मिळेल ते चालते.

तळमजल्यावर राहणाऱ्यांच्या काचा फुटणे व त्यावरून होणारी जबरदस्त भांडणे हा सुद्धा क्रिकेटचा एक साईड शो वा इफेक्टच म्हणायला हरकत नाही. अशा क्रिकेटला त्या टीमने बनवलेले नियम एवढाच आधार असतो. म्हणजे आमक्या भिंतीला चेंडू लागला की फोर, भिंतीवरून पलीकडे गेला की सिक्स, दुसऱ्या बाजूला सहसा स्टंप नसल्यामुळे बॉलरच्या पायाशी ठेवलेल्या दगडाला चेंडू लागला की आऊट.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : भारतीय वायुसेनेतील भरती

खरे खुरे म्हणजे लेदरचा बॉल घेऊन, दोन्हीकडे स्टम्प लावून ११ खेळाडू क्षेत्ररक्षण करत आहेत व दोन अंपायर त्यांच्यावर लक्ष ठेवून निर्णय देत आहेत असा खेळ सहसा शोधावा लागतो. म्हणजे दहा हजार हौशी टीममध्ये एखादीच टीम या पद्धतीत क्रिकेट खेळते. असे खेळणे हे बऱ्यापैकी महागडेही असते. असे खेळणे रीतसर शिकवण्यासाठी महिना दहा हजार रुपये फी घेऊन मुलांना शिकायला पाठवणे अत्यल्प लोकांनाच जमते. खरे तर आकडेवारी सोडता ही माहिती सामान्यपणे बहुतेकांना माहिती असते. त्यामुळे क्रिकेटचे आकर्षण व प्रत्यक्ष वास्तव यातील फरक बहुतेक लोकांना कळतो. पण त्याच वेळी क्रिकेटमध्ये मिळणाऱ्या पैशाचे आकर्षण प्रत्येकाच्या मनात सुप्तपणे दडलेले असते. मग त्यासाठीचे प्रयत्न, अट्टाहास, जिद्द, आणि याला खत पाणी घालण्यासाठी क्लासेस सुद्धा सगळीकडेच भरपूर आहेत.

मुलींचे क्रिकेट

मात्र या सगळ्यांमध्ये मुलींचे क्रिकेट नावाची चीज अजूनही स्वत:च्या पायावर फारशी उभी राहिली नाही. काही खेळ हे पुरुषांचेच या समजुतीला बॉक्सिंग आणि कुस्तीने धडा दिला आणि अनेक पदकांची लयलूट मुलींनी या दोन खेळात केली. अगदी जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल केले गेले. ती वेळ महिला हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, बास्केट बॉल या खेळांमध्ये अजून आली नाही. खेळाडूंची अत्यल्प संख्या इतकी कमी असते की दर्जेदार पूर्ण टीम एखाद्या शहरात तयार होते असेही नाही. त्यामुळे कोणीही मुलगी या खेळांकडे वळते आहे म्हटल्यावर साशंकतेने किंवा थोडेसे टिंगलीच्या सुरानेच त्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या दशकात या साऱ्यांमध्ये हळूहळू फरक पडायला सुरुवात झाली आहे. ‘चक दे इंडिया’ या सिनेमाने याला व या मागच्या कारण मीमांसेला छान तोंड फोडले. मुलींच्या या प्रकारच्या मैदानी खेळांना सगळीकडेच प्रेक्षकांचा तुटवडा असतो. प्रेक्षक नाहीत तर जाहिरातदार नाहीत. जाहिरात दार नाहीत तर प्रायोजक नाहीत. प्रायोजक नाहीत तर आयोजक पैसे आणणार कुठून? मग खेळाडूंना पैसे देणार कोण? आणि खेळणार कोण? अशा या दुष्टचक्रामध्ये महिलांचे हे काही खेळ अडकलेले आहेत.

निशी व महेशचे वेगळेपण

अर्थातच महेशच्या कुटुंबाकडे व निशीच्या खेळाकडे काहीशा टिंगलीच्या सुरात, उपेक्षेच्या नजरेने, तोंड देखले कौतुक करत सारेच नातेवाईक व मित्रमंडळीनी पहाणे हे स्वाभाविकच होते.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

यामध्ये थोडासा फरक पडला जेव्हा पेपरमध्ये निशीचे नाव छापून येऊ लागले तेव्हा. पण ते तरी किती वेळा येणार? वर्षातून दोन-तीनदा आले तरी फारच. बॉय कट केलेली मुलगी शाळेतील मुलींच्या वर्गात सुद्धा उठून दिसते तर एखाद्या मध्यमवर्गीय सामान्य घरातील बॉय कट केलेली मुलगी समोर सातत्याने वावरताना पाहून, तिला पुरुषी कपडे घालून रोज खेळायला जाता येताना पाहणारे पुणे, मुंबई शहरात सुद्धा दहा पंधरा वर्षांपूर्वी सहजपणे हे स्वीकारत नव्हते. एक वेगळे वास्तव या निमित्ताने सांगायचे झाले तर तोकडे कपडे घालणाऱ्या मुली, हॉट पॅन्ट नावाचा प्रकार घालून सार्वजनिक ठिकाणी हिंडणाऱ्या मुली सहजपणे स्वीकारणारा समाज आजही क्रिकेट किंवा फुटबॉल खेळणाऱ्या मुलींकडे त्याच सहजपणे पहात नाही.

निशीचे क्रिकेट थांबले तेव्हा या साऱ्या चर्चा नक्कीच थांबल्या. मात्र, त्या थांबताना हे व्हायचेच होते असा सूर होता. निशीने स्पोर्ट्स मॅनेजमेंट पूर्ण करून नोकरी स्वीकारली व तिची प्रगती होऊ लागली त्या वेळेला तिची मॅनेजरची भूमिकापण सहजपणे स्वीकारणारा समाज अजूनही तयार झालेला नाही. मात्र तिचे ऐकलेच पाहिजे हे तिच्या हाता खाली काम करणाऱ्यांना मात्र पक्के समजले. तिला नोकरी देणाऱ्या कंपनीने तिच्यातील क्षमता व तिची खेळातील समज लक्षात घेऊन नेमणूक केली आहे. कारण त्या कंपनीला ‘जेंडर बायस’, नाही. खेळातून अशा पद्धतीच्या विविध करिअर्स सुरू होतात हे मात्र आता लक्षात येऊ लागले आहे. पारंपरिक रस्ते सोडून त्याकडे वळणाऱ्यांचा ओघ मात्र अजून कमीच आहे.

पाहूया येत्या दशकात या साऱ्यांमध्ये कितपत बदल होतो तो.