BARC Mumbai recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे, मुंबई येथे ‘चालक’ [Driver] पदासाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नेमक्या किती जागांवर भरती केली जाणार आहे ते पाहा. या पदासाठी नोकरीचा अर्ज कसा करावा, अर्जाची अंतिम तारीख, पात्रता निकष काय आहेत, याबद्दल अधिक माहिती पाहा.
BARC Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभागाअंतर्गत चालक पदासाठी एकूण ५० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
BARC Mumbai recruitment 2024 : पात्रता निकष
चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त उमेदवाराचे वय हे ६५ वर्षांखालील असणे आवश्यक आहे. अर्जासाठी वयोमर्यादा ६५ अशी ठेवण्यात आली आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे लाईट मोटार व्हेईकल [LMV] आणि हेवी मोटार व्हेईकल [HMV] वाहनांचे वैध लायसन्स असणे आवश्यक आहे.
BARC Mumbai recruitment 2024 – भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग अधिकृत वेबसाईट लिंक
https://www.barc.gov.in/
BARC Mumbai recruitment 2024 – नोकरीची अधिसूचना –
https://www.barc.gov.in/careers/vacancy8.pdf
BARC Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरील चालक पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासाठी आवश्यक असणारा फॉर्म अधिसूचनेत दिलेला आहे.
नोकरीच्या अर्जासह उमेदवाराने आवश्यक असतील ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
फॉर्ममध्ये उमेदवारांनी आपली योग्य आणि अचूक माहिती भरणे अनिवार्य आहे.
कोणत्याही उमेदवाराचा नोकरीचा अर्ज अंतिम तारखेनंतर आल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २४ मे २०२४ अशी आहे.
वरील चालक पदाच्या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.