BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत १३ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ फार्मासिस्ट या दोन पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती तसेच वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, पगार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ फार्मासिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यात आला आहे.

पदसंख्या – कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ फार्मासिस्ट या दोन पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा आहे.

  • कार्यकारी सहाय्यक – ११
  • कनिष्ठ फार्मासिस्ट – २

वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 40 वर्षे ठरविण्यात आली आहे.

हेही वाचा : SSC & HSC Result Date 2024: १० वी, १२ वीचा निकाल कधी लागतो? कुठे व कसा पाहावा, गतवर्षीची आकडेवारी काय सांगते?

अर्ज पद्धती – या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – तुम्ही १४ मे २०२४ पर्यंत वरील पदांसाठी अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.becil.com/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.

अधिसुचना – अर्ज करण्यापूर्वी

https://www.becil.com/uploads/vacancy/451CMSS1may24pdf-ceb6447cce549875ba1d1740ae549c6a.pdf या लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचावी.

शैक्षणिक पात्रता – वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. वरील अधिसुचना वाचावी.

वेतन – वरील पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन देण्यात येईल.

  • कार्यकारी सहाय्यक – ३०,०००
  • कनिष्ठ फार्मासिस्ट – ३०,०००

हेही वाचा : यूपीएससी सूत्र : राजस्थानात सापडलेली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत अन् भारतीय नृत्यकलेचे बदललेले स्वरूप, वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट काळजीपूर्वक वाचावी.
  • शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करावा.
  • अर्जाबरोबर विचारलेली आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी
  • अपू्र्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.