सुहास पाटील
२०२४ मध्ये UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर झाले आहे. UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नाव, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक, परीक्षा सुरू होण्याचा दिनांक, पात्रतेच्या अटी इ. तपशील पुढीलप्रमाणे –
(८) कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (II) २०२४ –
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक १५ मे २०२४. परीक्षेचा दिनांक १ सप्टेंबर २०२४.
या परीक्षेतून पुढील ॲकॅडमीजमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या कोर्सेससाठी प्रवेश दिला जातो.
(i) इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (IMA), डेहराडून – आर्मी विंग. (ii) इंडियन नेव्हल ॲकॅडमी (INA), इझिमाला, केरळ – नेव्ही विंग.
(iii) एअरफोर्स ॲकॅडमी (AFA), हैदराबाद – एअरफोर्स विंग (प्री फ्लाईंग).
(iv) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA), चेन्नई – आर्मी विंग पुरुष/महिला उमेदवार.
पात्रता : IMA आणि OTA साठी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. INA साठी इंजिनिअरींग पदवी.
AFA साठी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. (१२ वी फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.)
महिला उमेदवार फक्त OTA मधील कोर्ससाठी पात्र असतात.
वयोमर्यादा : दिलेल्या कट ऑफ डेटला OTA साठी २० ते २४ वर्षे, इतर ॲकॅडमीजसाठी २०-२३ वर्षे.
हेही वाचा >>> MPSC मंत्र : अर्थव्यवस्थेतील गतिमान क्षेत्रे
निवड पद्धती : (i) ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा वेळ प्रत्येकी २ तास/ IMA, INA, AFA साठी ३ पेपर्स प्रत्येकी १०० गुणांसाठी (इंग्लिश, जनरल नॉलेज, इलेमेंटरी मॅथेमॅटिक्स).
OTA साठी २ पेपर्स प्रत्येकी १०० गुणांसाठी (इंग्लिश, जनरल नॉलेज).
(ii) इंटेलिजन्स आणि पर्सोनॅलिटी टेस्टसाठी इंटरव्ह्यू – IMA, INA आणि AFA साठी ३०० गुण; OTA साठी २०० गुण.
अंतिम निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूमधील एकत्रित गुणवत्तेनुसार.
(९) सेंट्रल आर्म्ड् पोलीस फोर्सेस (असिस्टंट कमांडंट्स) एक्झामिनेशन, २०२४ – (BSF, CRPF, CISF, ITBP, SSB).
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक २४ एप्रिल २०२४. परीक्षेचा दिनांक ४ ऑगस्ट २०२४.
पात्रता : पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.
वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे. उंची – (पुरुष ) – १६५ सें.मी., (महिला ) – १५७ सें.मी.
निवड पद्धती : (i) लेखी परीक्षा – पेपर-१ – जनरल अॅबिलिटी अॅण्ड इंटेलिजन्स – २०० गुण, वेळ २ तास. (ऑब्जेक्टिव्ह टाईप)
पेपर-२ – जनरल स्टडीज, निबंध आणि कॉम्प्रिहेन्शन – २०० गुण, वेळ ३ तास (वर्णनात्मक स्वरूपाची).
(ii) शारीरिक मापदंड चाचणी (PST). (iii) शारीरिक क्षमता चाचणी (PET) – (ए) १०० मीटर धावणे – पुरुष १६ सेकंद, महिला १८ सेकंद;
(बी) ८०० मीटर धावणे – पुरुष ३ मिनिटे ४५ सेकंद, महिला – ४ मिनिटे ४५ सेकंद;
(सी) लांब उडी – पुरुष ३.५ मीटर, महिला ३ मीटर;
(डी) गोळाफेक (७.२६ कि.ग्रॅ.) पुरुष ४.५ मीटर.
(iv) इंटरव्ह्यू/पर्सोनॅलिटी टेस्ट – १५० गुण.
(१०) कंबाईंड जीओ सायंटिस्ट (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२४
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक २० सप्टेंबर २०२३. परीक्षेचा दिनांक १८ फेब्रुवारी २०२४.
जीओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामधील पदांसाठी पात्रता : (ए) जीऑलॉजिस्ट – ग्रुप ‘ए’ – जीऑलॉजिकल सायन्स/ जीऑलॉजी/ अॅप्लाईड जीऑलॉजी/ जीओएक्स्प्लोरेशन/ मिनरल एक्स्प्लोरेशन/ इंजिनिअरींग जीऑलॉजी/ मरिन जीऑलॉजी/अर्थ सायन्सेस अॅण्ड रिर्सोसेस मॅनेजमेंट/ जीओकेमिस्ट्री इ. मधील पदव्युत्तर पदवी.
(बी) जीओफिजिसिस्ट्स पदांसाठी – ग्रुप ‘ए’ – एम.एस्सी. (फिजिक्स/ अॅप्लाईड फिजिक्स/ जीओफिजिक्स/ अॅप्लाईड जीओफिजिक्स/ मरिन जीओफिजिक्स इ.)
(सी) केमिस्ट – ग्रुप ‘ए’ – एम.एस्सी. (केमिस्ट्री/ अॅप्लाईड केमिस्ट्री/ अॅनालायटिकल केमिस्ट्री).
(डी) ज्युनियर हायड्रोलॉजिस्ट्स (सायंटिस्ट ‘बी’) ग्रुप ‘ए’ – जीओलॉजी/ अॅप्लाईड जीऑलॉजी/ मरिन जीऑलॉजी/ हायड्रोजीऑलॉजी विषयातील पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : जीऑलॉजिस्ट/ जीओफिजिसिस्ट/ केमिस्ट पदांसाठी २१ ते ३२ वर्षे. ज्युनियर हायड्रोलॉजिस्ट पदांसाठी २१ ते ३५ वर्षे.
निवड पद्धती : स्टेज-१ ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रीलिम एक्झाम – ४०० गुणांसाठी. पेपर-१ जनरल स्टडीज १०० गुण, वेळ २ तास. पेपर-२ संबंधित विषयावर आधारित प्रश्न, ३०० गुण, वेळ २ तास. प्रीलिम्सच्या गुणवत्तेनुसार मेन परीक्षेसाठी उमेदवार निवडले जातील.
(११) कंबाईंड जीओ-सायंटिस्ट (मेन) एक्झामिनेशन, २०२४ दि. २२ जून २०२४ पासून सुरू होणार. (२ दिवस)
निवड पद्धती : प्रत्येक स्ट्रीमनुसार ३ पेपर्स प्रत्येकी २०० गुणांसाठी, वेळ ३ तास, एकूण ६०० गुणांसाठी मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असते.
स्टेज-३ पर्सोनॅलिटी टेस्ट – २०० गुण. (किमान पात्रतेचे निकष नाहीत.)
(१२) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES)/इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस (ISS) एक्झामिनेशन, २०२४ –
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक १० एप्रिल २०२४. परीक्षा सुरू होण्याचा दिनांक २१ जून २०२४ (३ दिवस).
IES साठी पात्रता : इकॉनॉमिक्स/ ॲप्लाईड इकॉनॉमिक्स/ बिझनेस इकॉनॉमिक्स/ इकॉनॉमेट्रिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस (ISS) साठी पात्रता – स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/ अॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : IES/ ISS साठी २१ ते ३० वर्षे.
IES साठी निवड पद्धती : पार्ट-१ – लेखी परीक्षा – १,००० गुणांसाठी आणि पार्ट-२ मुलाखत (Viva- Voce) – २०० गुण.
लेखी परीक्षा IES साठी पार्ट-१ – (१) जनरल इंग्लिश – १०० गुण, (२) जनरल स्टडीज – १०० गुण, (३) जनरल इकॉनॉमिक्स-१ – २०० गुण, (४) जनरल इकॉनॉमिक्स-२ – २०० गुण, (५) जनरल इकॉनॉमिक्स-३ – २०० गुण, (६) इंडियन इकॉनॉमिक्स २०० गुण (पेपर १ ते ६ साठी वेळ प्रत्येकी ३ तास). (सर्व पेपर्स डिस्क्रीप्टिव्ह टाईप)
तांत्रिक कौशल्याचा विकास
सोसायटी फॉर मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ॲण्ड रिसर्च ( SAMEER) – आयआयटी कँपस, पवई, मुंबई. मुंबई येथे अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवारांना (१) RF and Microwave Systems, (२) Linear Accelerator Systems, (३) Opto Electronics डोमेन ( Domain) मधील कामावर आधारित शिक्षणाची ( Level-r Work Based Learning) संधी. उमेदवारांना वरील डोमेनमधील राज्य/ राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये कामाचा अनुभव घेता घेता तांत्रिक कौशल्य आणि नवनवीन तंत्रज्ञान (Technical Skills and Emerging Technologies) संपादन करून इंडस्ट्रीमध्ये काम मिळविण्याची संधी. WBL प्रोग्राम – दोन लेव्हल्समध्ये विभागलेला असेल. लेव्हल-१ व लेव्हल-२. प्रत्येक लेव्हलचा कालावधी ६ महिन्यांचा असेल. प्रत्येक तीन महिन्यांनंतर उमेदवारांची कामगिरी सायंटिस्ट्स, अॅकॅडेमिक आणि इंडस्ट्रियल एक्स्पर्ट्स यांच्या कमिटी ( Tech- MEC) द्वारा तपासली जाईल. कमिटीच्या शिफारशीनुसार उमेदवारांची कामगिरी पाहून किमान ५० टक्के उमेदवार लेव्हल-२ साठी निवडले जातील. प्रत्येक WBL लेव्हल यशस्वीरित्या पूर्ण केल्यास उमेदवारांना सर्टिफिकेट दिले जाईल.
एकूण प्रवेश क्षमता – २४ (अजा/ अज – १२, ईडब्ल्यूएस – ६, महिला – ६) (कोर्स लवकरात लवकर सुरू करण्यात येईल.)
पात्रता – B. E./ B. Tech. (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ आ/टी इंजिनीअरिंग) किंवा M. Sc. (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.सी.ए. च्या पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
इंटर्नशिपचा कालावधी – ६ महिने (पूर्ण वेळ) इंटर्नशिप लवकरात लवकर सुरू होणार.
स्टायपेंड – इंटर्न्सना दरमहा रु. १०,०००/- स्टायपेंड दिले जाईल.
निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना ऑनलाईन इंटरह्यू घेवून निवड केली जाईल. इंटरह्यूची तारीख/ लिंक उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज पोस्टाने पाठवायचा नाही.
निवडलेल्या उमेदवारांनी जॉईन होतेवेळी विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत १० वी/ १२ वीचे गुणपत्रक, पात्रता परीक्षेच्या सर्व सेमिस्टर्स/वर्षांची गुणपत्रके, पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) आधारकार्ड (यांच्या मूळ प्रती आणि त्यांच्या फोटोकॉपीचा एक संच घेवून यावे.) ऑनलाइन अर्ज https:// internship. acte- india. org/ ernet. php या संकेतस्थळावर दि. २१ जानेवारी २०२४ पर्यंत करावेत.
यूपीएससी परीक्षांचे कॅलेंडर
२०२४ मध्ये UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर झाले आहे. UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नाव, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक, परीक्षा सुरू होण्याचा दिनांक, पात्रतेच्या अटी इ. तपशील पुढीलप्रमाणे
क्रमश: