CISF Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफमध्ये लवकरच कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी ११३० जागांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

पदे किती ?

AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
survey of the cluster scheme was halted due to public outrage
नागरिकांच्या रोषामुळे क्लस्टर योजनेचे सर्व्हेक्षण थांबवले
The fake SBI branch was opened in Chhattisgarh's Sakti district
SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?
Bank of Baroda Recruitment 2024 Bank of Baroda is conducting the recruitment process for Supervisor posts
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या
Odisha Police Constable Recruitment 2024: Registration for 1360 posts begins at odishapolice.gov.in
ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती; १,३६० पदांसाठी अर्ज सुरू, ६९ हजारापर्यंत मिळणार पगार, अर्जप्रक्रिया जाणून घ्या
amazon employee cut off
‘सायलेंट सॅकिंग’ म्हणजे काय? ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी याचा वापर का करत आहे?
student visa canada new announcement
कॅनडात शिक्षणासाठी जाणे आता आणखी कठीण, कॅनडाकडून विद्यार्थी व्हिसात कपात; भारतीय विद्यार्थ्यांवर याचा कसा परिणाम होणार?

सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे कॉन्स्टेबल फायरमन या पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. देशभरात एकूण ११३० पदे रिक्त आहेत. यातील ७२ पदे महाराष्ट्र राज्यात आहेत. सीआयएसएफच्या भरती अंतर्गत महाराष्ट्रातील ७२ पदे पुढील प्रमाणे विभागलेली असतील. संपूर्ण राज्य खुला वर्ग २७ पदे आरक्षित वर्ग ३४ पदे एकूण ६१ पदे. तर नक्षल किंवा मिलिटन्सी क्षेत्र खुला वर्ग ५ पदे तर आरक्षित वर्ग ६ पदे एकूण ११ पदे.

वयोमर्यादा आणि वेतन

पात्र उमेदवार ३० ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पात्रता बारावी उत्तीर्ण इतकी आहे. संबंधित उमेदवरांनी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.सीआयएसएफमधील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १८ ते २३ वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. यासाठीच्या अर्जाचं शुल्क १०० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क द्यावं लागणार नाही.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलत कॉन्स्टेबल फायरमन या पदावर नेमणूक झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना २१,७०० ते ६९,१००/- इतके वेतन दिले जाईल

अधिसूचना (Notification)

हेही वाचा >>Indian Bank: बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी; इंडियन बँकेत थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

अर्ज प्रक्रिया कशी करावी? CISF, Job Application:

इच्छुक उमेदवार या भरतीत ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करून त्यांचा सहभाग नोंदवू शकतात. भरतीत सहभागी होण्यासाठीची अर्ज प्रक्रिया दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल. अर्ज सादर करण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे. या तारखे नंतर जमा करण्यात आलेले अर्ज या भरतीत ग्राह्य धरले जाणार नाहीत.सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल फायरमन या पदावर नेमणूक होण्यासाठी उमेदवाराने इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.