CME Pune Group C Recruitment 2023 : पुणे शहरात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ती म्हणजे पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) पुणे येथे अनेक जागांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्जदेखील मागवण्यात येत आहेत. या नोकरीसाठी पात्र उमेदवार कधी अर्ज करु शकतात त्यासाठीचे पात्रता निकष, वयोमर्यादा, परीक्षेची तारीख, निवड प्रक्रिया,काय आहेत ते जाणून घेऊया.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या या भरतीमध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार ४ फेब्रुवारी २०२३ ते ४ मार्च २०२३ दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर आर्मी सीएमई पुणे ग्रुप सी भरती २०२३ साठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
आर्मी सीएमई पुणे ग्रुप सी अधिसूचना PDF वाचण्यासाठी (https://s3-ap-south-1.amazonaws.com/adda247jobs-wp-assets-adda247/jobs/wp-content/uploads/sites/14/2023/02/13122023/Army-CME-Pune-Notification.pdf) या लिंकला भेट द्या.
किती जागांवर होणार भरती ?
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) पुणे यांनी ग्रुप सी पदासाठी एकूण १९९ पदांसाठीची भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार कोणत्या जागेसाठी किती उमेदवारांची भरती केली जाणार ते तक्त्याद्वारे समजून घेऊया.
हेही वाचा- इंजिनियरिंग पास आहात? तर आजच ‘या’ यूनिवर्सिटी मध्ये नोकरीसाठी अर्ज करा; १.७५ लाखांपर्यंत मिळेल पगार
| मल्टी टास्किंग स्टाफ | ४९ | 
| लोअर डिव्हिजन क्लर्क | १४ | 
| लस्कर | १३ | 
| इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | १ | 
| वरिष्ठ मेकॅनिक | २ | 
| मशीन माइंडर लिथो | १ | 
| प्रयोगशाळा सहाय्यक | ३ | 
| स्टोअरकीपर | २ | 
| सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर | ३ | 
| ग्रंथपाल लिपिक | २ | 
| सॅंड मॉडलर | ४ | 
| कुक | ३ | 
| मोल्डर | १ | 
| कारपेंटर | ५ | 
| मशिनिस्ट वुडवर्किंग | १ | 
| पेंटर | १ | 
| इंजिन आर्टिफिशियर | १ | 
| स्टोअरमन टेक्निकल | १ | 
| फिटर जनरल मेकॅनिक | ६ | 
| इलेक्ट्रीशियन | २ | 
| लोहार | १ | 
| लेखापाल | १ | 
पात्रता –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पोस्टनुसार दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असावं. सर्वात महत्वाच उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीसाठी दिलेल्या नियम आणि पूर्ण करणं आवश्यक आहे. यासाठी कॉलेजच्या अधिकृत बेवसाईटवर दिलेली माहिती सविस्तर पद्धतीने जाणून घ्या.
आर्मी सीएमई पुणे ग्रुप सी भरती २०२३ साठीची वयोमर्यादा –
सिव्हिल मोटर ड्रायव्हर वगळता सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षांची वयोमर्यादा आहे.
चालकाची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षादरम्यान आहे.
अशी होणार निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील स्टेप्सनुसार होणार –
- लेखी परीक्षा
 - स्किल टेस्ट / प्रॅक्टीकल टेस्ट (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
 - कागदपत्र पडताळणी
 - वैद्यकीय तपासणी
 
असा भरा अर्ज –
उमेदवारांनी सर्वात आधी ते आर्मी सीएमई पुणे अधिसूचनेतून दिलेल्या निकषानुसार पात्र आहेत का ते तपासावं.
त्यानंतर cmepune.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या तिथे तुम्हाला अर्ज करण्याचा पर्याय मिळेल.
योग्य तपशीलांसह अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
तुमच्या श्रेणीनुसार फी भरा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्ज भरुन झाल्यावर त्याची प्रिंट काढा.
