● रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटर ( RAC), दिल्ली, ग्रॅज्युएट इंजिनीअर्स आणि सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्सची डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ( DRDO), व्हेपन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स इंजिनीअरिंग इस्टॅब्लिशमेंट ( WESEE) एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी ( ADA) आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग ( CME) इ. मध्ये ‘सायंटिस्ट-बी’ पदांवर GATE स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – १५२.

रिक्त पदांचा तपशिल –

(१) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – DRDO – ३५ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १६); ADA – ३ पदे (अज – १, इमाव – १, खुला – १); WESEE – २ पदे (ईडब्ल्यूएस – १, खुला – १)

पात्रता – फर्स्ट क्लास बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इ.)

(२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – DRDO – ३३ (अजा – ५, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १४); ADA – १ पद (इमाव); WESEE – १ पद (खुला); CME – १ पद (खुला).

(३) कॉम्प्युटर सायन्स अँडइंजिनीअरिंग – DRDO – २९ पदे (अजा – ४, अज – ३, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ११); ADA – ३ पदे (इमाव – १, खुला – २); उटए – १ पद (खुला); हएरएए – १ पद (खुला).

(४) इलेकट्रिकल इंजिनीअरिंग – DRDO – ६ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

(५) मटेरियल इंजिनीअरिंग/मटेरियल सायन्स अँडइंजिनीअरिंग/ मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग – DRDO – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २); ADA – १ पद (खुला).

(६) केमिकल इंजिनीअरिंग – DRDO – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

(७) एअरोनॉटिकल अँड एअरोस्पेस इंजिनीअरिंग – DRDO – ५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १)

(८) सिव्हील इंजिनीअरिंग – DRDO – १ पद (खुला)

(९) बायोमेडिकल इंजिनीअरिंग – DRDO – २ पदे (अजा – १, अज – १).

पात्रता – पद क्र. १ ते ९ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील २०२३/ २०२४/२०२५ चा व्हॅलिड GATE स्कोअर.

(१०) फिजिक्स – DRDO – ४ पदे (अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(११) केमिस्ट्री – DRDO – ३ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – १).

(१२) मॅथेमॅटिक्स – DRDO – २ पदे (इमाव – १, खुला – १).

(१३) एंटॉमॉलॉजी – AFMC – १ पद (इमाव).

(१४) बायोस्टॅटिस्टिक्स – AFMC – १ पद (खुला). (१५) क्लिनिकल सायकॉलॉजी – AFMC – १ पद (खुला).

(१६) सायकॉलॉजी – SCN जालंधर/ SCC भोपाळ/ SCE प्रयागराज/१ AFSB/ AFSB – ७ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ७).

(ह्युमॅनिटिज अँड सोशल सायन्स ( XH) GATE Score)

पद क्र. १० ते १६ साठी पात्रता – संबंधित विषयातील फर्स्ट क्लाससह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील व्हॅलिड GATE स्कोअर.

DRDO मधील १२५ रिक्त पदांपैकी ५ पदे दिव्यांग कॅटेगरी HH – १, LD – १, AAV, DW – ३ साठी राखीव.

अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना निकाल दि. ३१ जुलै २०२५ पूर्वी सादर करावा लागेल.

CGPA/ CPI मध्ये दर्शविलेले ६.७५/१० point scale पात्रता परीक्षेतील गुण ६०% इतके समजले जातील.

वयोमर्यादा – (दि. ४ जुलै २०२५ रोजी) खुला/ईडब्ल्यूएस- ३५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या शंकासमाधानासाठी संपर्क – ०११-२३८१२९५५, इतर शंकासमाधानासाठी ०११-२३८३०५९९/२३८८९५२६, ई-मेल – pro. recruitment@gov. in किंवा directrec.rac@gov.in

ऑनलाइन अर्ज

https://rac.gov.in या संकेतस्थळावर ४ जुलै २०२५ (सायंकाळी ४ वाजे) पर्यंत करावेत.

ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती

● ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा ( Unit of Munitions India Ltd.) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम). NCTVT (आताचे NCVT) यांनी जारी केलेले अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ( AOCP) (ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिस सर्टिफिकेटधारक उमेदवारांची) डेंजर बिल्डींग वर्कर ( DBW)l AOCP कर्मचारी पदांवर ठराविक मुदतीसाठी करारपद्धतीने भरती.

एकूण रिक्त पदे – १३५ (अजा – ३३, अज – १३, इमाव – ५३, ईडब्ल्यूएस – २५, खुला – ११) (माजी सैनिकांसाठी २५ पदे राखीव) (अपंग उमेदवार या पदांसाठी पात्र नाहीत.)

वेतन – मूळ वेतन रु. १९,९००/- डी.ए. रु. १०,५४७/-.

पात्रता – NCTVT (आताची NCVT) यांनी जारी केलेले अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ( AOCP) ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेटधारक उमेदवार ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण दिले गेले आहे किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून AOCP ट्रेड अॅप्रेंटिसेस NAC सर्टिफिकेटधारक.

( i) ऑर्डनन्स फॅक्टरीमधून AOCP ट्रेडमधील अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

( ii) शासनमान्यता प्राप्त संस्थेमधून AOCP ट्रेड अॅप्रेंटिसेस NAC सर्टिफिकेटधारक तसेच IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रि. अँड ए.सी. मेकॅनिक या ट्रेडमधील आयटीआय पात्रताधारक उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना १ महिन्याचे सेफ हँडलिंग ऑफ एक्स्प्लोझिव्ह्ज अॅम्युनिशन्स, सेफ्टी नॉर्म्स यांचे ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा येथे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरच त्यांची ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदामध्ये DBW पदावर भरती केली जाईल.

वयोमर्यादा – (दि. ३१ मे २०२५ रोजी) १८ ते ४० वर्षे.

कामाचे स्वरूप – मिलिटरी स्फोटके (एक्स्प्लोझिव्हज) आणि दारुगोळा (अॅम्युनिशन)चे उत्पादन आणि हाताळणी.

आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज पुढील पत्त्यावर पोस्टाने ४ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

The Chief General Manager, Ordnance Factory, Chanda, Dist. Chandrapur, Maharashtra – ४४२ ५०१.

लिफाफ्यावर ‘ Application for the post of tenure based DBW Personnel On Contract Basis’ असे लिहावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237@gmail.com