ESIC Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने पॅरामेडिकल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. पॅरामेडिकलच्या २७५ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.esic.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ESIC पॅरामेडिकल भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. नोकरी मिळविणाऱ्या उमेदवारांना स्तर-३, ४ आणि ५ अंतर्गत पगार मिळेल. वेतन स्तर- ५ अंतर्गत वेतनश्रेणी रुपये २९,२००- ९२३०० आहे.

या पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये ऑडिओमीटर टेक्निशियन, डेंटल मेकॅनिक, ईसीजी टेक्निशियन, ज्युनिअर रेडिओग्राफर, ज्युनिअर वैद्यकीय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक), फार्मासिस्ट (आयुर्वेद), फार्मासिस्ट (होमिओपॅथी), रेडिओग्राफर यासह अनेक पदांवर रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा – सातवी पास ते पदवीधरांना महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या २१०९ जागांसाठी भरती सुरु

ESIC भरती 2023 अर्ज शुल्क
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. दुसरीकडे, SC/ST/PWBD/विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क रु. २५० आहे. पात्र उमेदवार खाली दिलेल्या अधिसूचना लिंकवर क्लिक करून पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहिती तपासू शकतात.

ESIC भरती 2023 अधिसूचना येथे पहा – https://www.esic.gov.in/attachments/recruitmentfile/012396db22ab1e59dd01c0a653c0af8c.pdf

निवड प्रक्रिया
पात्र अर्जदारांची फेज-१ आणि २ लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल. फेज-१ ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना फेज-२ साठी बोलावले जाईल.

हेही वाचा –MBBS उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! AFMS अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या ६५० जागांसाठी भरती सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ESIC भरती 2023: कसे अर्ज करावे?
सर्वात आधी ESIC अधिकृत वेबसाइट http://www.esic.gov.in वर दिलेल्या रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा. येथे अर्जाच्या फॉर्म लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरा. आवश्यक कागदपत्रे जमा करून अर्जाचे शुल्क जमा करा. तुमचा फॉर्म जमा होईल. पुढे अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि तुमच्या जवळ ठेवा.