सुहास पाटील
१) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) ( MSEDCL) ‘ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (डिस्ट्रीब्युशन/सिव्हील)’ पदांची सरळसेवा पद्धतीने १ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरती. १ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ‘असिस्टंट इंजिनीअर डिस्ट्रीब्युशन/असिस्टंट इंजिनीअर सिव्हील या नियमित’ पदावर सामावून घेण्यात येईल. (वेतन श्रेणी – ४९,२१० – १,१९,३१५) Advt. No. ०७/२०२३ dt. २९.१२.२०२३
(१) ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (डिस्ट्रीब्युशन) – एकूण रिक्त पदे – २८१ (अजा – ४३, अज – ०, विजा-अ – १०, भज-ब – ५, भज-क – ९, भज-ड – १३, विमाप्र – १७, इमाव – १३७, आदुघ – २८, खुला – १९). महिलांसाठी एकूण ८५ पदे राखीव (अजा – १३, अज – ०, विजा-अ – ३, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – ४, विमाप्र – ५, इमाव – ४१, आदुघ – ८, खुला – ६).
आरक्षित पदे – खेळाडू – १४, माजी सैनिक – ४३, दिव्यांग – १३ (गट-ब – ऐकण्यातील दुर्बलता – ७, गट-क OL/ OA/CP/ Dw/AAV – ६), अनाथ – ३.
पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी वगळता इतर कोणत्याही इंजिनीअरिंग शाखेतील पदवीधारक MSEDCL चे कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत.)
(२) ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (सिव्हील) – एकूण रिक्त पदे – ४० (अजा – ७, अज – ५, विजा-अ – १, भज-क – २, भज-ड – २, विमाप्र – १, इमाव – १०, आदुघ – na६, खुला – ६).
महिलांसाठी एकूण १३ पदे राखीव (अजा – २, अज – २, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ३, आदुघ – २, खुला – २).
आरक्षित पदे – खेळाडू – १ (इमाव), माजी सैनिक – ६, दिव्यांग – २ (गट-ब – ऐकण्यातील दुर्बलता – १, गट-क OL/ OA/ CP/ Dw/ AAV – १).
पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी (सिव्हील इंजिनीअरिंग पदवी वगळता इतर कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवीधारक MSEDCL चे कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत.) ज्या उमेदवारांनी GATE-२०२१, GATE-२०२२, GATE-२०२३ परीक्षा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/सिव्हील इंजिनीअरिंग विषयांत उत्तीर्ण केली आहे, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षेतील १५० पैकी प्राप्त गुणांना ९० टक्के वेटेज व GATE स्कोअरसाठी १० टक्के वेटेज देऊन अंतिम निवड यादी बनविली जाईल.
हेही वाचा >>> स्कॉलरशीप फेलोशीप : ‘स्टेम’च्या विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती
ज्या इलेक्ट्रिकल/सिव्हील इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक उमेदवारांनी इलेक्ट्रिकल/सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किंवा उच्च शैक्षणिक अर्हता धारण केली आहे असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – (दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी) ३७ वर्षे (मागासवर्गीय/ आदुघ/ खेळाडू/ अनाथ – ४२ वर्षे, दिव्यांग/ माजी सैनिक – ४७ वर्षे, MSEDCL चे कर्मचारी – ५७ वर्षे)
कमाल वयोमर्यादा – (मागासवर्गीय/ आदुघ/ खेळाडू/ अनाथ – ३७ वर्षे, दिव्यांग, माजी सैनिक – ४७ वर्षे).
मानधन – दरमहा रु. २२,०००/-
निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा (अंदाजे मार्च २०२४ मधे होईल.) प्रोफेशनल नॉलेज व सामान्य अभियोग्यता चाचणी ( General Aptitude) यावर आधारित राहील. (१) तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान – ५० प्रश्न, ११० गुण, (२) सामान्य अभियोग्यता – (अ) तर्कशक्ती ( Reasoning) – ४० प्रश्न, २० गुण, (ब) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (संख्यात्मक अभियोग्यता) – २० प्रश्न, १० गुण, (क) मराठी भाषा – २० प्रश्न, १० गुण, एकूण १३० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे. चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण दंड म्हणून वजा करण्यात येतील.
नमुना अर्ज व माहिती http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) असलेबाबत नमूद करणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>> बृहन्मुंबई महानगरपालिकेत HR पदासाठी होणार भरती! ८१ हजारापर्यंत मिळेल पगार, आजच करा अर्ज
अजा/अज वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्या त्या मागासप्रवर्गासाठी विहीत करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. ५००/- जीएसटी; मागासवर्गी, आदुघ व अनाथ – रु. २५० जीएसटी
दिव्यांग आणि माजी सैनिक यांना फी माफ आहे.
ऑनलाइन अर्ज http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर दि. २० मार्च २०२४ पर्यंत करावेत.
ईएसआयसीमधील संधी
एम्प्लॉयिज स्टेट इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (ESIC) Ministry of Labour & Employment मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ( UPSC) मार्फत ‘नर्सिंग ऑफिसर’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १,९३० (अजा – २३५, अज – १६४, इमाव – ४४६, ईडब्ल्यूएस – १९३, खुला – ८९२) (१६८ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव). ( UPSC ( Recruitment by Selection) Vacancy No. 24035201707)
पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड).
वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,०००/-.
वयोमर्यादा – (दि. २७ मार्च २०२४ रोजी) ( i) १८-३० वर्षे (कमाल वयोमर्यादा – इमाव – ३३ वर्षे, अजा/अज/खाते अंतर्गत कर्मचारी – ३५ वर्षे, दिव्यांग – ४० वर्षे).
पात्रता – B. Sc. Nursing किंवा Post Basic B. Sc. (Nursing) किंवा General Nursing Midwifery Diploma (GNM) आणि किमान ५० खाटांच्या हॉस्पिटलमधील १ वर्षाचा अनुभव आणि नर्स किंवा नर्स अॅण्ड मिडवाईफ स्टेट नर्सिंग काऊन्सिलकडे रजिस्टर.
प्रोबेशनचा कालावधी २ वर्षांचा असेल. प्रोबेशन दरम्यान उमेदवारांना ESIC चे इंडक्शन ट्रेनी यशस्वीरित्या पूर्ण करावे लागेल.
निवड पद्धती – पेन आणि पेपर आधारित रिक्रूटमेंट टेस्ट (RT).
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा २ तास कालावधी. (नर्सिंग कोर्सशी निगडीत विषयांवर आधारित) चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.
लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार निवडले जातील.
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पणजी इ. परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा दि. ७ जुलै २०२४ रोजी घेतली जाईल.
अर्जाचे शुल्क – रु. २५/- Net Banking ने दि. २७ मार्च २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत भरता येतील.ऑनलाइन अर्ज https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २७ मार्च २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जात काही सुधारणा करण्यासाठी कमिशनच्या वेबसाईटवर EDIT/ CORRECTION ऑप्शन दि. २८ मार्च ते ३ एप्रिल २०२४ दरम्यान उपलब्ध असेल.