10th Result 2025 official Website Link : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे काही दिवसांपूर्वी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यापाठोपाठ आता दहावीच्या निकालाची उत्सुकता सुद्धा वाढली आहे. विद्यार्थी व पालकांची उत्सुकता पाहता सोशल मीडियावर तारखांबाबत खोटी माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण, आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. आता हा निकाल जेव्हा येईल तेव्हा पाहायचा, कुठे व कसा हे जाणून घेऊया..
महाराष्ट्र दहावीचा निकाल कुठे तपासायचा (Where to Check Maharashtra Class 10 SSC Results 2025)
दहावीचे विद्यार्थी २०२५ चा दहावीचा निकाल खालील वेबसाइटवर पाहू शकतात…
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो करा ( check Maharashtra Class 10 SSC Results 2025)
१. सगळ्यात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.
२. वेबसाइटच्या होमपेजवर, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्ही तुमचे लॉगिन डिटेल्स (नाव, हॉल तिकीट क्रमांक ) भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
४. यामुळे तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पाहू शकता.
५. सगळी माहिती बरोबर आहेत का ते तपासा.
६. निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.
दहावीची बोर्डाची परीक्षा (Maharashtra SSC Results) २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली. २०२४ आणि २०२३ या मागील वर्षांत, महाराष्ट्र मंडळाने अनुक्रमे २७ मे आणि २ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर केला होता. तर यावर्षी हा निकाल १३ मे २०२५ रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे…