प्रा. रवींद्र कुलकर्णी

आजवर महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे आहे व त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे या प्रश्नांवर चर्चा सुरू होती. नेहमीप्रमाणे सर्व एकत्र जमल्यावर प्रा. केदार यांनी प्रा. रमेश सरांना प्रश्न विचारला, ‘‘सर आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत बोलत होतो. पण, या धोरणाबाबत अन्य राज्यांची स्थिती कशी आहे? त्यांनी याबाबत कोणती भूमिका घेतली आहे?’’ याला जोडून वेदांतने विचारलं, ‘‘सर, अन्य राज्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाबाबत कोणतं धोरण स्वीकारलं आहे? याबद्दलही सांगाल का?’’

प्रा रमेश सरांनी उत्तर दिले, ‘‘भारतात, कर्नाटक हे  NEP 2020च्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांनी हे धोरण स्वीकारलं आहे. या राज्यांनी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये एकाधिक आगमन-निर्गमन पर्यायांसह या योजनेचे संचालन करणारे राज्य-स्तरीय नियम मंजूर केले आहेत. हैदराबाद विद्यापीठासारख्या केंद्रीय विद्यापीठांनी फेज-I साठी  NEP-2020 अंमलबजावणी योजना तयार केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठानेदेखील ( JNU) डय़ुअल डिग्री प्रोग्रामच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बाहेर पडण्याचा पर्याय मंजूर केला आहे. २०२२-२३ शैक्षणिक वर्षांत दिल्ली विद्यापीठामध्ये चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाचा अभ्यास करणारी पहिली बॅच शिक्षण घेत आहे.’’

रमेश सर पुढे म्हणाले, ‘‘आता आपण आंध्र प्रदेशाबाबत बोलू या व त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवू या. आंध्र प्रदेश सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या शिफारशींची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली आहे आणि अंमलबजावणी केलेल्या प्रमुख शिफारशींपैकी एक म्हणजे ४ वर्षांचा पदवी स्तरावरील ऑनर्स अभ्यासक्रम. याचं वैशिष्टय़ म्हणजे, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षांला उपलब्ध करून दिलेला ४ वर्षांचा पदवी स्तरावरील ऑनर्स अभ्यासक्रम आणि पदवी स्तरावरील ४ वर्षांचा संशोधनासह उपलब्ध करून दिलेला अभ्यासक्रम. आंध्र प्रदेश स्टेट कौन्सिल ऑफ हायर एज्युकेशनने ४-वर्षीय  वॅ पदवी (ऑनर्स) आणि ४-वर्षीय  वॅ पदवी (संशोधनासह ऑनर्स) च्या चौथ्या वर्षांसाठी मानक कार्यप्रणाली आणली आहे. ही मानक कार्यप्रणाली महाविद्यालये आणि विद्यापीठांद्वारे ४-वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या चौथ्या वर्षांची अंमलबजावणी कशी करावी याबद्दल तपशीलवार सूचना प्रदान करते, त्याचबरोबर ती विद्यार्थ्यांना त्यांना योग्य वाटेल अशा विषयाची निवड करण्यास सक्षम कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन करते आणि त्यांच्या आवडीच्या विषयाची / क्षेत्राची निवड करून त्यांच्या करिअरचा मार्ग त्या दृष्टीने पुढे जाण्यास सुलभता देते.’’

प्रा. सुनील सरांनी विचारलं, ‘‘सर, आंध्र प्रदेशने  NEP 2020संबंधी स्वीकारलेल्या धोरणाच्या आणखी काही वैशिष्टय़ांविषयी सांगाल का?’’

‘‘जरूर,’’ रमेश सर म्हणाले,

‘‘सर्वात पहिलं वैशिष्टय़ म्हणजे, बहुविद्याशाखीय धोरण स्वीकारल्यानंतर पहिल्या तीन वर्षांसाठी तीन विषयांची निवड विद्यार्थी करू शकतात.

अभ्यासाच्या चौथ्या वर्षांतील तीन विषयांपैकी कोणताही एक विषय प्रमुख म्हणून निवडण्याची लवचीकता विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली आहे.

श्रेयांकांना आधारभूत मानणारा, अध्ययनानंतर विद्यार्थ्यांना उत्तमरित्या शैक्षणिक निकालांवर योग्य तो सुपरिणाम घडवणारा हा परिणामाधिष्ठित अभ्यासक्रम आहे.

बहुविद्याशाखीय अभ्यासांतर्गत विषय निवड करताना व त्यांना जीवन कौशल्यांचा सहयोग देणारी लवचिकता तो प्रदान करतो.

बहुविद्याशाखीय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम ( SDCs)त्यातील विविध डोमेन, कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान या विषयातील अभ्यासक्रम निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेले निवड स्वातंत्र्य आहे.

अभ्यासाच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये भविष्यातील कामासाठी आवश्यक कौशल्ये सुनिश्चित करण्यासाठी कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम (SECs-  Skill Enhancement Courses), यातही विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन निवडीचे स्वातंत्र्य देण्याची लवचिकता हा अभ्यासक्रम देतो.

विद्यार्थ्यांसाठी खास उन्हाळी सत्राची योजना; या सत्रात (अभ्यासक्रमाच्या १ ते २ वर्षांच्या दरम्यानच्या उन्हाळय़ाच्या सुट्टीत) चार श्रेयांकांचा अनिवार्य असा समुदाय सेवा प्रकल्पाची योजना आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती सद्सद् विवेकबुद्धी, कनवाळू बांधिलकी आणि आपुलकीची भावना जागृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिकावर आधारलेले, अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शैक्षणिक वर्षांतले उन्हाळय़ाच्या सुट्टीतील अल्पमुदतीचे, विद्यार्थ्यांना चार श्रेयांक मिळवून देणारे शिक्षुता/ प्रशिक्षुता/ प्रत्यक्ष कार्यानुभव येथे दिले जातात.

कामाच्या जगासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त कौशल्ये आत्मसात करण्याच्या उद्देशाने आणि पदवीपूर्वी करिअरच्या पर्यायांचा शोध घेण्याच्या उद्देशाने एक पूर्ण सत्रासाठीची शिक्षुता/ प्रशिक्षुता किंवा प्रत्यक्ष कार्यानुभव यात आवश्यक आहे.

ऑनर्ससह ४ वर्षांच्या पदवीसाठी अभ्यासाच्या चौथ्या वर्षांसाठी

 a.         ऑनर्स पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थी पाठपुरावा करू शकतो;

 b.         अभ्यासाच्या पहिल्या तीन वर्षांत अभ्यास केलेल्या तीन प्रमुखांपैकी कोणत्याही प्रमुख विषयातील अभ्यासक्रम; हे एखाद्या विषयातील सखोल ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम करते;

 c.         उच्च क्रमाचे अभ्यासक्रम आणि कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश;

d.         दोन अनिवार्य स्वरूपाचे ऑनलाइन ट्रान्स डिसिप्लिनरी अभ्यासक्रम;

e.          विद्यार्थी ४० टक्के नियमित अभ्यासक्रम ऑनलाइन मोडमध्ये निवडू शकतात.

संशोधनासह ४ वर्षांच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षांसाठी

a.       संशोधनासह ऑनर्स पदवी संपादन करण्यासाठी, विद्यार्थी ५ संशोधनपद्धती अभ्यासक्रम करू शकतात;

 b         या ५ पैकी ३ संशोधनपद्धती अभ्यासक्रम हे कला, मानव्यविद्याशाखा, विज्ञान आणि वाणिज्य यांसाठी एकसमान आहेत;

c संशोधन पद्धती अभ्यासक्रमांपैकी २ अभ्यासक्रम हे विशिष्ट अभ्यासक्रमातील असू शकतात;

d  दोन अनिवार्य ऑनलाइन ट्रान्सडिसिप्लिनरी कोर्स;

e  निवडलेल्या स्पेशलायझेशनमधील एक वैयक्तिक संशोधन प्रकल्प;

रमेश सरांनी आज आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची वैशिष्टय़े समजावून दिली होती. सरांनी हसत हसत सर्वाचा निरोप घेताना म्हटलं, ‘‘ही उद्याच्या विद्यार्थ्यांच्या सर्वप्रभावी शिक्षणाची सुरुवात आहे. हळूहळू ती सर्वत्र रुजेल. पुढच्या वेळी आपण आणखी काही राज्यांतील  NEP 2020च्या शिफारशींची अंमलबजावणीविषयी माहिती घेऊ या.’’

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर