Rail Wheel Factory recruitment 2024 : रेल व्हील फॅक्टरीमध्ये सध्या अॅप्रेंटिस [Apprentices] पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. या पदांसाठी नोकरी करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची काय पद्धत आहे ते जाणून घ्या. इच्छुक उमेदवाराने वरील पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, त्याची अंतिम तारीख काय आहे ते पाहा.

Rail Wheel Factory recruitment 2024 : पात्रता निकष

पद आणि पदसंख्या :

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’
EVM and VV Pat Controversy Occurs Frequently
विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?

रेल व्हील फॅक्टरीमध्ये अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी भरती सुरू आहे. त्यामध्ये एकूण १९२ जागा उपलब्ध आहेत.

वयोमर्यादा :

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा १५ ते २४ या वयोगटातील असणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : AIIMS recruitment 2024 : एम्स’मध्ये ‘या’ पदासाठी होत आहे मेगा भरती! जाणून घ्या अर्जाची अंतिम तारीख…

शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. अथवा आयटीआय [ITI] उत्तीर्ण असावा.

वेतन :

शिकाऊ पदावरील उमेदवारास १०,८९९/- रुपये ते १२,२६१/- रुपयांपर्यंत वेतन दिले जाऊ शकते.

Indian railway jobs 2024 – रेल व्हील फॅक्टरी अधिकृत वेबसाईट –
https://rwf.indianrailways.gov.in/

Indian railway jobs 2024 – अधिसूचना –
https://rwf.indianrailways.gov.in/uploads/ACT%20Apprentice%20Notification%202023-24_compressed(1).pdf

Rail Wheel Factory recruitment 2024 : अर्ज कसा करावा?

अॅप्रेंटिस पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा :
पत्ता – प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगळूरु- ५६००६४.
इच्छुक उमेदवाराने अर्ज अंतिम तारखेआधी पाठवावा.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २२ मार्च २०२४ अशी आहे.

वर नमूद केलेल्या अॅप्रेंटिस पदासंबंधीची अधिक माहिती हवी असल्यास रेल व्हील फॅक्टरीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचून घ्यावी. वेबसाइट व अधिसूचना वर नमूद केलेली आहे.