Indian Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भारतीय रेल्वे भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण २३८ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल २’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता –

असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.

किंवा – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पुर्ण केलेला असणं आवश्यक आहे.

हेही वाचा- Assistant Professor Jobs: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मोठी भरती, १४ एप्रिलपर्यंत करा अर्ज

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावं. OBC प्रवर्गातील ४५ आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय ४७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार – असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या तारखा –

हेही वाचा- ७०,००० रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे त्वरित करा अर्ज, परीक्षा न देता मिळेल नोकरी

ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात तारीख – ७ एप्रिल २०२३

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०२३

उमेदवारांची निवड – संगणक-आधारित चाचणी/लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर अॅप्टिट्युड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाईल. सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जातील. भारतीय रेल्वे भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway recruitment 2023 for 238 vacancies check post qualification and other details jap
First published on: 01-04-2023 at 10:51 IST