या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे – (कंसात केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयात/ खाते/कार्यालयात पदे भरली जातात हे नमूद केले आहे.) (ए) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ( JTO) (सेंट्रल सेक्रेटरिएट ऑफिशियल लँग्वेज सर्व्हिस ( CSOLS)), (बी) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ( JTO) आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स ( AFHQ), (सी) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर /ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर/ज्युनियर ट्रान्सलेटर (केंद्र सरकारची विविध मंत्रालये/खाती/ऑफिसेस), (डी) सिनियर हिंदी ट्रान्सलेटर( SHT)/सिनियर ट्रान्सलेटर ( ST) (केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ खाती/कार्यालये), (इ) सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स).
रिक्त पदांचा तपशिल – अंदाजे एकूण ४३७ पदे (रिक्त पदांची नेमकी संख्या योग्यवेळी जाहीर केली जाईल.).
वेतन – पद कोड क्र. (ए) ते (सी) (ई) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर/ज्युनियर ट्रान्सलेटर/ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर/सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) पदांसाठी – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन दरमहा रु. ७०,०००/-. पद कोड क्र. (डी) सिनियर हिंदी ट्रान्सलेटर/ सिनियर ट्रान्सलेटर पदासाठी पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन दरमहा रु. ८७,०००/-.
पात्रता – (सर्व पदांसाठी) (दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी) हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.)
किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा परीक्षेचे माध्यम हिंदी असावे.)
किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील हिंदी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.
किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील इंग्रजी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम हिंदी असावे.
किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदी/इंग्रजीपैकी एक पदवीचे माध्यम असावे आणि त्यापैकी दुसरा विषय पदवीला अभ्यासलेला असावा.
आणि हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदीमध्ये ट्रान्सलेशन पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण किंवा हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी ट्रान्सलेशनचा केंद्र/राज्य सरकारचे ऑफिस/गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकींगमधील २ वर्षांचा अनुभव.
(सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) पदांसाठी शारीरिक मापदंड – उंची – (पुरुष – १८५ सें.मी.) (अनुसूचित जमाती – १६२.५ सें.मी.); उंची – महिला – १५५ सें.मी. (अज – १५० सें.मी.); छाती – (पुरुष) ७७-८२ सें.मी. (अज – ७६-८१ सें.मी.) सिनियर हिंदी ट्रान्सलेटर ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.)
वयोमर्यादा – सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) पदांसाठी दि. २६ जून २०२५ रोजी आणि इतर पदांसाठी दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी) ३० वर्षेपर्यंत .
निवड पद्धती – पेपर-१ – ( CBT दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी घेतली जाईल.) (संगणक आधारित, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न) ( i) जनरल हिंदी – १०० प्रश्न, १०० गुण. ( ii) जनरल इंग्लिश – १०० प्रश्न, १०० गुण. एकूण २०० गुण, वेळ २ तास. (प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.) पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार पेपर-२ साठी निवडले जातात.
पेपर-२ – (वर्णनात्मक स्वरूपाचा) यात ट्रान्सलेशन आणि निबंध लेखन यांचा समावेश असेल. २०० गुण, वेळ २ तास. दोन उतारे भाषांतरासाठी दिलेले असतील. एक उतारा हिंदीतून इंग्लिश व दुसरा इंग्लिशमधून हिंदी आणि दोन निबंध एक हिंदीमध्ये व दुसरा इंग्लिशमध्ये.
परीक्षा केंद्र – अमरावती, कोल्हापूर, छ. संभाजी नगर, जळगाव, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ.
शंकासमाधानासाठी SSCWR चा संपर्क क्र. ७७३८४२२७०५/ ९८६९७३०७००.
परीक्षा शुल्क – रु. १००/- ऑनलाइन पद्धतीने दि. २७ जून २०२५ (२३.०० वाजे)पर्यंत भरता येईल.
ऑनलाइन अर्ज https:// www. ssc. gov. in या संकेतस्थळावर दि. २६ जून २०२५ (११ वाजे)पर्यंत करता येतील.
suhaspatil237 @gmail. com