सुहास पाटील

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) दि. २१ एप्रिल २०२४ रोजी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (I) २०२४ आयोजित करणार आहे, यातून ४५७ पदांची भरती पुढील कोर्सेससाठी केली जाईल. (Examination Notice No. ४/२०२४/ CDS- I)

(१) इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून (आयएमए) – १०० पदे. (१३ पदे. NCC-‘C’ सर्टिफिकेट (आर्मी विंग) धारकांसाठी राखीव). १५८ वा (DE) कोर्स जानेवारी, २०२५ पासून सुरू होणार.

(२) इंडियन नेव्हल अॅकॅडमी (आयएनए), इझिमाला, केरळ – ३२ पदे. (६ पदे. NCC-‘C’ सर्टिफिकेट (नेव्हल विंग) धारकांसाठी राखीव). एक्झिक्युटिव्ह ब्रँच (जनरल सर्व्हिस/हैड्रो) कोर्स जानेवारी, २०२५ पासून सुरू होणार.

(३) एअरफोर्स अॅकॅडमी, हैदराबाद (२१७ वा प्री-फ्लाईंग ट्रेनिंग कोर्स) – ३२ पदे. (३ पदे. NCC-‘C’ सर्टिफिकेट (एअरविंग) धारकांसाठी राखीव) कोर्स जानेवारी २०२५ पासून सुरू होणार.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : सागरी वाहतुकीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजना कोणत्या?

(४) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई – २७५ पदे (१२१ वा एसएससी (पुरुष) (एनटी) (UPSC). कोर्स एप्रिल, २०२५ पासून सुरू होणार.

(५) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई – १८ पदे. ३५ वा एसएससी (महिला) (NT) (UPSC) कोर्स) एप्रिल, २०२५ पासून सुरू होणार.

महिला उमेदवार फक्त ओटीए, चेन्नई ‘आर्मी 34th SSC Women (NT) UPSC कोर्स’ ट्रेनिंगसाठी पात्र आहेत. त्यांनी अर्जात OTA प्रथम आणि एकच पसंती दाखवावी.

जे उमेदवार एअरफोर्स अॅकॅडमीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी AFA करिता प्रथम पसंती द्यावी. त्यांना कॉम्प्युटर पायलट सिलेक्शन सिस्टीम CPSS ला सामोरे जावे लागेल. जर त्यांनी आअ साठी दुसरा वा तिसरा पसंतीक्रम दिल्यास तो अग्राह्य धरला जाईल. ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना लग्न करता येणार नाही.

पात्रता – (अ) आयएमए आणि ओटीएसाठी – पदवी (कोणत्याही शाखेतील).

(ब) आयएनएसाठी – इंजिनीअरिंग पदवी.

(क) एअरफोर्स अॅकॅडमीसाठी – पदवी (कोणत्याही शाखेतील) परंतु १२ वी फिजिक्स, गणित विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा इंजिनीअरिंग पदवी. अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा : आयएमए/आयएनए – अविवाहीत पुरुष उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००१ ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा.

एअरफोर्स अॅकॅडमीसाठी उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००१ ते १ जानेवारी २००५ दरम्यानचा असावा. (दि. १ जानेवारी २०२५ रोजी २० ते २४ वर्षे). DGCA कमर्शियल पायलट लायसन्सधारक – जन्म दि. २ जानेवारी १९९९ ते दि. १ जानेवारी २००५ दरम्यानचा असावा. २५ वर्षांखालील उमेदवार अविवाहीतत असावा. २५ वर्षांवरील विवाहीत उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (त्यांना married accommodation दिले जाणार नाही.)

(४) ओटीएसाठी अविवाहीत पुरुष उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९९९ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.

(५) ओटीए (SSC महिला नॉन टेक्निकल कोर्स) – अविवाहीत महिला/ अपत्य नसलेल्या विधवा/ घटस्फोटीत महिला (ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही.) – जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.)

शारीरिक मापदंड : आर्मीसाठी उंची (पुरुष) फ्लाईंग ब्रँचसाठी १६३ सें.मी., इतर ब्रँचेससाठी – (पुरुष)१५७ सें.मी., (महिला) – १५२ सें.मी.; नेव्हीसाठी (पुरुष) – १५७ सें.मी.; एअरफोर्ससाठी (पुरुष) – फ्लाईंग ब्रँचसाठी १६२.५ सें.मी. ग्राऊंड ड्युटीसाठी १५७.५ सें.मी., छाती (पुरुष) – किमान ५ सें.मी. छाती फुगविता येणे आवश्यक. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात वजन असावे. दृष्टी – Uncorrected Visition 6/12 & 6/12 Corrected Visition R 6/6 L 6/6.

अर्जाचे शुल्क : रु. २००/-. (अजा/ अज/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने दि. ९ जानेवारी २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत भरता येईल. पे-इन स्लिप जनरेट करण्यासाठी असलेला ‘Pay by Cash’ ऑप्शन दि. ८ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजता) डिअॅक्टिव्हेट केला जाईल.

निवड पद्धती : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा आणि मुलाखत.

आयएमए, आयएनए आणि एअरफोर्स अॅकॅडमीसाठी (इंग्लिश – १०० गुण, जनरल नॉलेज – १०० गुण, प्राथमिक गणित – १०० गुण, (गणित विषयाचा अभ्यासक्रम १० वी स्तरावरील व इतर विषयांचा अभ्यासक्रम पदवी स्तरावरील असेल.) कालावधी प्रत्येकी – २ तास. एकूण ३०० गुण.

ओटीएसाठी – इंग्लिश – १०० गुण, जनरल नॉलेज – १०० गुण, कालावधी प्रत्येकी २ तास. एकूण २०० गुण.

लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी सारखेच गुण असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

परीक्षा केंद्र : औरंगाबाद/ मुंबई/ नवी मुंबई/ पुणे/ ठाणे, नागपूर, पणजी इ.

एसएसबी – मुलाखत (इंटेलिजन्स अँड पर्सोनॅलिटी टेस्ट) – कालावधी ४ दिवस. स्टेज-१ – ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटींग (OIR) टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन डिस्क्रीप्शन टेस्ट (PP & DT). स्टेज-२ – इंटरव्ह्यू, ग्रुप टेस्टींग ऑफिसर टास्क, सायकॉलॉजी टेस्ट्स आणि कॉन्फरन्स.

ट्रेनिंग : आयएमए येथे आर्मीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना (जेंटलमन कॅडेट्स) १८ महिन्यांचे मिलिटरी ट्रेनिंग दिले जाईल. हे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जेंटलमन कॅडेट्सना लेफ्टनंट रँकवर परमनंट कमिशनवर तैनात केले जाईल. IMA आणि OTA येथील ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. कॅडेट्सना रु. १ कोटीचे आर्मी ग्रुप इन्श्युरन्स संरक्षण दिले जाईल.

एअरफोर्स अॅकॅडमी येथे फ्लाईंग ब्रँचसाठी ७४ आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना फ्लाईंग ऑफिसर पदावर तैनात केले जाईल. कॅटेडट्सना ट्रेनिंग दरम्यान रु. २१,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

ओटीए – येथे जेंटलमन कॅडेट्स/लेडी कॅडेट्सना ४९ आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर तैनात केले जाईल व त्यांना मद्रास युनिव्हर्सिटीकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अॅण्ड स्टॅटेजिक स्टडीज पदवी दिली जाईल.

आयएनएमध्ये ४४ आठवड्यांचा नेव्हल ओरिएंटेशन कोर्स, ६ महिन्यांचे ऑफिसर्स सी ट्रेनिंग, ६ महिन्यांचे सब-लेफ्टनंट अफ्लोट ट्रेनिंग, सब लेफ्टनंट (टेक्निकल कोर्स) अफ्लोट अॅटॅचमेंट ३३ आठवडे आणि फुल नेव्हल वॉचकिपींग सर्टिफिकेट – ६ ते ९ महिने दिले जाईल. १८ महिन्यांचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना सब लेफ्टनंट रँकवर कमिशन दिले जाईल.

ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना पे-लेव्हल १० वर वेतन ठरविले जाईल, जे अंदाजे रु. १,२५,०००/- एवढे आहे व त्यांना ट्रेनिंग दरम्यानचे इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल.

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी पदांचा (कोर्ससाठीचा) आपला पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक. शंका समाधानासाठी संपर्क दूरध्वनी ०११२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३ . ऑनलाइन अर्जात काही बदल/ सुधारणा करावयाची असल्यास UPSC च्या वेबसाईटवर १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२४ (१८.०० वाजेपर्यंत) दरम्यान उपलब्ध असेल. आर्मीमधील महिला ऑफिसर्स २ वर्षांच्या चाईल्ड केअर लिव्हसाठी पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज http://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ९ जानेवारी २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावा. अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती www.upsconline.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ आणि सिग्नेचर jpg format मध्ये स्कॅन करून अपलोड करावयाचे आहेत.