Konkan Railway Bharti 2023 : रेल्वेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे कोकण रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीकरिता हजर राहू शकतात. या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीची तारखा डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ महिन्यातील आहेत. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोकण रेल्वे भरती २०२३

पदाचे नाव – वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी.

एकूण पदसंख्या – या भरती अंतर्गत एकून ३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.

वयोमर्यादा – ३५ ते ५५ वर्षादरम्यान

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख – १४, १८, २०, २२, २६, २८, ३० डिसेंबर २०२३ आणि ०१, ०४, ०५, ०८ जानेवारी २०२४

हेही वाचा- MBBS उमेदवारांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! ESIC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

अधिकृत वेबसाईट –

https://konkanrailway.com/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

https://drive.google.com/file/d/1NJMLNX7IBMDNuWxxqw09MNiyQ-PhWieS/view