Pune jobs 2024 : सध्या पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या अंतर्गत संपदा सहकारी बँके लिमिटडद्वारे नोकरीसाठी भरती सुरू आहे. त्यामध्ये ‘लिपीक’ म्हणजेच क्लार्क या पदासाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता निकष आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे ते जाणून घेऊ. तसेच इच्छुक उमेदवारांना लिपीक पदासाठी अर्ज करायचा असल्यास, त्यांनी तो २८ फेब्रुवारी २०२४ या तारखेआधी करावा.

Pune jobs 2024 : संपदा सहकारी बँके लिमिटेड : नोकरी, पात्रता व निकष

संपदा सहकारी बँक लिमिटेडमध्ये लिपीक पदासाठी भरती सुरू आहे.

या पदावर अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.
तसेच एम.एस.सी.आय.टी. [MSCIT] किंवा तशाच एखाद्या कोर्समध्ये उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीच्या संधी उपलब्ध; ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू…

Pune jobs 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन – अधिकृत वेबसाइट –
https://punebankasso.com/default.aspx

Pune jobs 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन – अधिसूचना –
https://punebankasso.com/default.aspx

लिपीक पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
त्यासाठी pba.recruit.ssb@gmail.com या ई-मेल अॅड्रेसचा वापर करावा.

हेही वाचा : PMPML Recruitment 2024 : पुणे परिवहन मंडळात ‘MBA’ उमेदवारांनाही नोकरीची संधी; पाहा माहिती….

परीक्षा शुल्क
ऑनलाइन अर्जासह ७००/- रुपये + १८% जी.एस.टी. असे एकूण ८२६/- रुपये परीक्षा शुल्क भरल्याची पावती जोडावी.

वयोमर्यादा
या पदासाठी इच्छुक उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते २८ वर्षे अशी आहे.

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख
या लिपीक पदासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२४ अशी आहे.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेनंतर अर्ज पाठविल्यास तो ग्राह्य मानला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्जासह परीक्षा शुल्क भरावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, ती पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यास मिळू शकेल. अथवा नोकरीसंदर्भातील अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचनेची लिंक वर देण्यात आली आहे.