Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. ‘वैद्यकीय अधिकारी [Medical Officer], बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष [Male MPW] या पदांसाठी एकूण १४२ जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारखा १२ व १४ फेब्रुवारी, अशा आहेत. तरी, इच्छुक उमेदवारांनी अर्ज कुठे आणि कसा करावा ते पाहा. तसेच अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते जाणून घ्या.

Kalyan-Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : रिक्त जागा

nagpur, Voters Confused, polling station, Voters Confused between polling station, new hyderabad house, old hyderabad house, voting 2024, lok sabha 2024, election 2024, nagpur news, voting news, marathi news,
नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

वैद्यकीय अधिकारी या जागेसाठी एकूण ६७ रिक्त पदे उपलब्ध आहेत.
तसेच बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष [Male MPW] या जागेसाठी एकूण ७५ रिक्त पदांवर भरती होणार आहे.

हेही वाचा : PDEA Bharti 2024: पुणे जिल्हा शिक्षण मंडळात नोकरीची सुवर्ण संधी! अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या

एकूण १४२ रिक्त जागांवर भरती

Kalyan-Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : अर्ज करण्याचे पात्रता निकष
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नोकरीचे ठिकाण कल्याण हे असणार आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असावी.
खुल्या गटातील उमेदवाराचे वय- ३८ वर्षांपर्यंत राहील.
राखीव गटातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय- ४३ वर्षांपर्यंत राहील.

KalyanDombivli Mahanagarpalika Bharti 2024 – अधिसूचना-
https://drive.google.com/file/d/1q2EZSRIZVqGP_lbnUPaKYwDS861jrHyg/view

या रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीचा असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेमका कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ते पाहा.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता- आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प.), ता. कल्याण, जि. ठाणे</p>

हेही वाचा : ARI Pune recruitment 2024 : आगरकर संशोधन संस्थेमध्ये ‘शास्त्रज्ञ’ पदासाठी भरती सुरू; अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या

Kalyan-Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : शैक्षणिक पातळी

वैद्यकीय अधिकारी [Medical Officer] या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडे MBBS / BAMS पदवी असणे आवश्यक आहे.
पुरुष MPW या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे विज्ञान क्षेत्रातील बारावी + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, असे शिक्षण असणे आवश्यक आहे.

Kalyan-Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : वेतन

वैद्यकीय अधिकारी [Medical Officer] या पदासाठी ६०,०००/- रुपये इतके वेतन उमेदवारास रुजू झाल्यानंतर देण्यात येईल.
पुरुष MPW या पदासाठी १८,०००/- रुपये इतके वेतन उमेदवारास रुजू झाल्यानंतर देण्यात येईल.

Kalyan-Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

१. संपूर्ण आणि योग्य माहिती भरलेल्या अर्जाच्या फॉर्मची प्रत/प्रिंट
२. जन्मदाखला [शाळा सोडल्याचा दाखला/ जन्माचा दाखला]
३. दहावी आणि बारावीची मार्कशीट [गुणपत्रिका] आणि सनद

४. पदवीच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)

५. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र [MBBS/BAMS]

६ . शासकीय/निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाची प्रमाणपत्रे
७. राखीव संवर्गातील [रिझर्व्हेशन] उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
८. नॉन क्रिमीलेअर [आवश्यकता असल्यास]
९. आधार कार्ड
१०. पॅन कार्ड
११ उमेदवाराचा सध्याचा फोटो
१२. उमेदवार विवाहित असल्यास, विवाह नोंदणी प्रमाणपत्र. तसेच नावात बदल असल्यास तसे राजपत्र (Gazette)
१३. ड्रायव्हिंग लायसन्स / वाहन चालविण्याचा परवाना
१४. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
१५. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

Kalyan-Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी.
हा अर्ज ऑनलाइन नसून, ऑफलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यामुळे वर किंवा अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज भरावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १२ व १४ फेब्रुवारी २०२४, अशी आहे. उमेदवारांनी वेळेआधी अर्ज करावा.
या भरतीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास वर दिलेल्या अधिसूचनेत वाचावी.