Maha RERA Recruitment 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणात [Maharashtra Real Estate Regulatory Authority] ‘वित्त सल्लागार’ हे पद रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी सध्या भरती सुरू आहे. वित्त सल्लागार पदासाठी अर्ज करायचा असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. मात्र, हा अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि पात्रता निकष काय आहेत ते जाणून घ्या.
Maha RERA Recruitment 2024 : ‘वित्त सल्लागार’ पदाचे पात्रता निकष
१. रिक्त पदे
वित्त सल्लागार या पदासाठी एकूण तीन जागा उपलब्ध आहेत.
२. शैक्षणिक पात्रता
वित्त सल्लागार या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे आवश्यक असलेल्या
गोष्टी खालीलप्रमाणे :
इच्छुक उमेदवाराकडे एम.कॉम, एम.बी.ए. फायनान्स [M.Com., M.B.A. Finance] अथवा सीए इंटर उत्तीर्ण [CA Inter (Clear)] असे शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच निवडलेल्या विषयाच्या क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
स्किल्स ॲनॅलिटिकल्स इंटरप्रिटेशन – कंपॅरिटिव्ह ॲनॅलिसिस
हेही वाचा : Loco Pilot Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
३. वेतन
वित्त सल्लागार या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५०,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
Maha RERA Recruitment 2024 – अधिकृत वेबसाइट –
https://maharera.maharashtra.gov.in/
Maha RERA Recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1E8C6daSPNEjYvTBfB8zs5yJd-Lqh2Fx0/view
४. अर्ज कसा करावा आणि अर्जाची अंतिम तारीख
वित्त सल्लागार या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ऑनलाइन म्हणजे महारेराला अर्जाचा ई-मेल पाठवायचा आहे.
इच्छुक उमेदवाराने अर्जाचा ई-मेल techoff2@maharera.mahaonline.gov.in – या मेल आयडीवर पाठवावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी अशी आहे.
त्यामुळे उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेआधी करावा.
अर्ज नेमका कशा पद्धतीने करायला हवा याबद्दलची सर्व माहिती ही महारेराच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारास या भरतीबद्दलची अधिक माहिती हवी असल्यास वर दिलेली अधिसूचना वाचावी. अथवा वर नमूद केलेल्या महारेराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.