Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता पदांच्या एकूण ५९८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीक याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३-
शैक्षणिक पात्रता –
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + ९ वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून २ वर्षे अनुभव.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + ७ वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून २ वर्षे अनुभव.
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + ३ वर्षे अनुभव.
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी.
सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी.
हेही वाचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – वयोमर्यादा पाहण्यासाठी जाहिरात पाहा.
- मागासवर्गीय – ५ वर्षे.
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – ७०० रुपये.
- मागासवर्गीय – ३५० रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
अधिकृत बेवसाईट – https://www.mahatransco.in/
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑक्टोबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
कार्यकारी अभियंता – (https://drive.google.com/file/d/1sIcrnZnEfqN1Kg3NWuPS2kGgT7WJpNW1/view)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – (https://drive.google.com/file/d/1s-Lud3TDKL2llei4VbCMSuSALwGG0DUX/view)
उप कार्यकारी अभियंता – (https://drive.google.com/file/d/1of9n_K-zLiN_8x7svmMg6PJRQJBkw4dl/view)
सहाय्यक अभियंता – (https://drive.google.com/file/d/1bwAiUP_r1i8qB2ABrFLsTdVYyZRuB6Hm/view)
