Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत ५३४७ पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक पदासाठी आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. हा अर्ज कसा भरायचा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, पगार याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि विशेषत: १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ज्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत काम करायची इच्छा आहे, त्यांनी आजच अर्ज करा.

पदाचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज मागविले आहे.

पदसंख्या – विद्युत सहाय्यक पदासाठी एकूण ५३४७ जागा रिक्त आहेत. खालील प्रमाणे या रिक्त जागांचे विभाजन करण्यात आले आहेत.

  • अनुसूचित जाती – ६७३
  • अनुसूचित जमाती – ४९१
  • विमुक्त जाती (अ)- १५०
  • भटक्या जाती (ब) – १४५
  • भटक्या जाती (क) – १९६
  • भटक्या जाती (ड) – १०८
  • विशेष मागास प्रवर्ग – १०८
  • इतर मागास प्रवर्ग – ८९५
  • ईडब्ल्यूएस – ५००
  • अराखीव – २०८१

हेही वाचा : ONGC मध्ये २५ पदांसाठी होणार भरती! १.८ लाखापर्यंत मिळू शकतो पगार, लगेच करा अर्ज

वयोमर्यादा – पात्र उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवार १२ वी पास असावा.

परीक्षा शुल्क –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२४

पगार –

  • प्रथम वर्ष- १५,०००/- रुपये
  • द्वितीय वर्ष – १६,०००/- रुपये
  • तृतीय वर्ष- १७,०००/- रुपये

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/ सविस्तर माहितीसाठी या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा. त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली माहिती सविस्तर वाचावी.
तारखेपुर्वी नीट अर्ज भरावा.
अर्ज भरल्यानंतर परिक्षा शुल्क भरावी.