BMC Bharti – MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबई महापालिकेत काही जागांसाठीची भरती जाहीर करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना पालिकेने जारी केली आहे. या भरतीअंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कम्युनिटी मेडिसिन विभागातील सहाय्यक प्राध्यापक आणि प्लास्टिक सर्जरी विभागातील सहाय्यक प्राध्यापक ही पदे भरली जाणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती मंडळ, मुंबई यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीनुसार या भरती अंतर्गत २ पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुत आणि पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. भरतीबाबतच्या सविस्तर माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला अवश्य भेट द्यावी. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – कम्युनिटी मेडिसिन विभागातील सहाय्यक प्राध्यापक, प्लास्टिक सर्जरी विभागातील सहाय्यक प्राध्यापक.

हेही वाचा- भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ २४२ पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया

एकूण रिक्त पदे – २

वयोमर्यादा –

सर्वसाधारण उमेदवार -१८ ते ३८ वर्षे.

मागासवर्गीय उमेदवार – १८ ते ४३ वर्षे.

अर्ज शुल्क – ५८० रुपये + १८% GST

मासिक पगार – एक लाख रुपये प्रतीमहिना

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

हेही वाचा- सरकारी नोकरीची मोठी संधी! राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

कम्युनिटी मेडिसिन विभागातील सहाय्यक प्राध्यापक –

उमेदवारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (M.D. पदवी किंवा D.N.B किंवा M.S.) आवश्यक.
अनुभव:- मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात (निवासी/रजिस्ट्रार/प्रात्यक्षिक/शिक्षक) म्हणून ३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव.

प्लास्टिक सर्जरी विभागातील सहाय्यक प्राध्यापक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (M.D. पदवी किंवा D.N.B किंवा M.S.)
अनुभव – मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात (निवासी/ रजिस्ट्रार/प्रात्यक्षिक/ शिक्षक) म्हणून ३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २८ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ आणि ९ मे २०२३ (पोस्टनुसार).