Ministry of Defence Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने संरक्षण नौदलाच्या एकात्मिक मुख्यालय मंत्रालय, नवी दिल्ली, संरक्षण मंत्रालय (MoD) येथे वरिष्ठ डिझाइन अधिकारी ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. संरक्षण मंत्रालय भरतीबाबतची अधिकृत जाहिरात जारी केली आहे. त्यानुसारर, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए राजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल) वर्गीकरण अंतर्गत वरिष्ठ डिझाइन अधिकारी ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदाच्या ५ रिक्त आहेत. यातील ३ जागा अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी असणार आहेत. तर भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबत माहिती जाणून घेऊया.

संरक्षण मंत्रालयातील सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदासाठी ऑनलाइन भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२३ ही आहे. सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी स्तर – ११ नुसार पगार देण्यात येणार आहे. शिवाय, त्यांना केंद्र सरकारच्या ७ व्या वेतन आयोगातील सीपीसीतील मॅट्रिक्स एनपीएचा लाभही मिळणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना ६७ हजार ७०० ते २ लाख ८७ हजार रुपये महिना इतका पगार मिळेल.

हेही वाचा- महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, १० वी पास असाल तर आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

महत्वाच्या सूचना –

१ – UPSC मंत्रालयाने जारी केलेल्या २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सर्व पात्र अर्जदारांनी जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ‘A’ राजपत्रित (गैर- मिनिस्ट्रियल) या वर्गीकरणाअंतर्गत सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदांसंदर्भात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे.

२ – सर्व इच्छुक उमेदवारांनी ORA प्रक्रिया पूर्ण करताना ऑनलाइन भरती अर्जांमध्ये किमान पात्रतेपेक्षा योग्य/संबंधित क्षेत्रातील अनुभव सादर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा- तुम्हीही होऊ शकता सीबीआय अधिकारी? केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे भरतीची प्रक्रिया पाहा

अधिकचा तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संरक्षण मंत्रालय भरती २०२३ ची अधिसूचना देखील वाचली पाहिजे.

पोस्टचं नाव – संरक्षण मंत्रालयातील सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल)

एकूण जागा – ५ पैकी ३ अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी आहेत तर ५ रिक्त जागांवर निवडलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळेल.

पोस्ट क्लासिफिकेशन – जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ‘अ’ राजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल)

पोस्टिंगचं स्थान – संरक्षण मंत्रालय (नौदल) एकात्मिक मुख्यालय, नवी दिल्ली

पगार – ६७ हजार ७०० ते २ लाख ८७ हजार रुपये महिना.

वयोमर्यादा –

  • अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनारक्षित श्रेणीतील अर्जदाराचं वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • भारत सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार केंद्र सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशात सरकारी नोकरीत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत असेल.

शैक्षणिक पात्रता –

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखांमध्ये बॅचलर पदवी किंवा त्याच्याशी संबंधित समकक्ष शिक्षण आवश्यक.

हेही वाचा- Air hostess बनून जगभर फिरायचे आहे? जाणून घ्या हवाई सुंदरी होण्यासाठीची पात्रता, पगार व इतर सविस्तर माहिती

अनुभव –

जहाजांचे डिझाईन/इन्स्टॉलेशन/बांधणी यामध्ये ५ वर्षांचा अनुभव असावा.

महत्वाची सूचना – गरज पडल्यास, उमेदवारांची शैक्षणिक आणि अनुभवाची पात्रतेच्या अटी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून शिथिल केल्या जातील.

निवड पद्धती – पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल.

अर्ज शुल्क –

ओपन/ईडब्ल्यूएस/OBC उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल.

II) आरक्षित उमेदवारांना आणि कोणत्याही श्रेणीतील महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यात सूट दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी.