SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक तरुण मुले मुली बँकिग क्षेत्रात करिअर करण्यासाठी नोकरीच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. जर बँकिग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने मॅनेजरसह विविध पदांसाठी अर्ज मागविले आहे. १२१ पदांसाठी नोकरीची संधी आहे. त्यामुळे ही संधी न गमावता उमेदवारांनी अर्ज भरावा. त्यामुळे उशीर करू नका. अर्ज करा आणि या सुवर्ण संधीचे सोने करा. या पदभरतीसाठी अर्ज कसा करावा आणि यासह शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

पदे –

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा पदांसाठी अर्ज मागविले आहे.
  • व्यवस्थापक – Manager (Credit Analyst): ५०
  • सहाय्यक व्यवस्थापक Manager (Security Analyst): २३
  • उप व्यवस्थापक (Security Analyst): ५१
  • व्यवस्थापक (Security Analyst): ३
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (Application Security): ३
  • सर्कल डिफेन्स बँकिग सल्लागार (CDBA): १

वरील पदांसाठी उमेदवाराचे वय २५ ते ३५ वर्ष असावे. निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि त्यानंतर त्यांची या पदांसाठी निवड होईल. नोकरीचे ठिकाण हे भारतात कोठेही असेल. त्यामुळे बँकिग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी हा अर्ज भरावा. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२४ आहे. त्यामुळे वेळ न घालवता अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

अर्ज फी –

सामान्य/इडब्लूएस/ओबीसी (General/EWS/OBC) उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क आहे तर एसी/एसटी/ बीडब्लूबीडी (SC/ ST/ PwBD) उमेदवारांना अर्ज शुल्कमध्ये सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा : Agniveer Bharti 2024 : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू; जाणून घ्या महत्त्वाच्या अटी अन् अर्ज कसा भरायचा?

अर्ज कसा करावा?

  • sbi.co.in या अधिकृत बेसवाइटवर जा.
  • या पदभरतीविषयी सविस्तर माहिती नीट वाचा.
  • त्यानंतर होमपेजवर भरतीच्या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज नीट भरून घ्या. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.