MMRCL Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही एकूण ९ जागांसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला मुंबई मेट्रो रेलमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेळ न घालवता अर्ज करू शकता. या नऊ जागा कोणत्या पदांसाठी आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे; याशिवाय पगार, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊ या. पदाचे नाव - सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) सहायक महाव्यवस्थापक (आरएस) सहायक व्यवस्थापक (पीआर) सहायक व्यवस्थापक (अग्निशामक) उपअभियंता (सुरक्षा) कनिष्ठ अभियंता -II (E&M) अग्निशमन निरीक्षक कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) सीनियर असिस्टंट (एचआर) पदसंख्या - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत ९ विविध पदांसाठी नऊ रिक्त जागा आहेत. सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) - १ सहायक महाव्यवस्थापक (आरएस) - १ सहायक व्यवस्थापक (पीआर) - १ सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)- १ उपअभियंता (सुरक्षा) - १ कनिष्ठ अभियंता -II (E&M) - १ अग्निशमन निरीक्षक - १ कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) - १ सीनियर असिस्टंट (एचआर) - १ हेही वाचा : IGI Aviation recruitment 2024 : कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी मोठी भरती! पाहा अर्ज प्रक्रिया शैक्षणिक पात्रता - या पदांसाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी अधिसुचना वाचावी. वयोमर्यादा - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे आहेत. नोकरी ठिकाण - नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. अर्ज पद्धती - तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख - अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे. अधिकृत वेबसाईट - अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी www.mmrcl.com या अधिकृत साइटवर क्लिक करावे. अधिसुचना - अर्ज करण्यापूर्वी या पीडिएफ लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचावी. वेतनश्रेणी - विविध पदांनुसार वेतनश्रेणी ठरवण्यात आली आहे सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) - ७०,००० - २,००,००० रुपये/- सहायक महाव्यवस्थापक (आरएस) - ७०,००० - २,००,००० रुपये/- सहायक व्यवस्थापक (पीआर) - ५०,०००- १,६०,००० रुपये/- सहायक व्यवस्थापक (अग्निशामक) - ५०,०००- १,६०,००० रुपये/- उपअभियंता (सुरक्षा) - ५०,०००- १,६०,००० रुपये/- कनिष्ठ अभियंता -II (E&M) - ३५,२८० ते ६७,९२० रुपये/- अग्निशमन निरीक्षक - ३५,२८० ते ६७,९२० रुपये/- कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) - ३५,२८० ते ६७,९२० रुपये/- सीनियर असिस्टंट (एचआर) - ३४,०२० ते ६४,३१० रुपये/- अर्ज कसा करावा? अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचून घ्या. नीट माहिती भरा. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी भरा.