MSCE Pune Recruitment 2024 : पुणे शहरातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत ‘मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक’ या पदांवर भरती होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या, तसेच नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता अर्ज कसा करायचा त्याबद्दल माहिती पाहा. तसेच भरतीसाठी पात्रता निकष जाणून घ्या.

MSCE Pune Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

मुख्य लिपिक या पदासाठी एकूण ६ जागा रिक्त आहेत.
वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण १४ जागा रिक्त आहेत.
निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण ३ जागा रिक्त आहेत.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
loksabha election 2024 election campaign material rates finally decrease
उमेदवारांचं चांगभलं! प्रचार साहित्याच्या दरात अखेर कपात; लोकसभा निवडणुकीत…

एकूण रिक्त पदांची संख्या २३ अशी आहे.

हेही वाचा : बारावीनंतर काय करायचं ठरत नाही? पर्यटनाची आवड असल्यास Tourism क्षेत्रातील नोकरीचे पर्याय पाहा

MSCE Pune Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

मुख्य लिपिक –

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची, कुठल्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.

टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनात मराठी ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

मुख्य लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ लिपिक –

वरिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे किमान दोन वर्षांचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक आणि
टंकलेखन पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

तसेच, उमेदवार एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

निम्नश्रेणी लघुलेखक –

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी असणे आवश्यक.

टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मराठी ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट, तसेच इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

उमेदवार एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

हेही वाचा : कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…

MSCE Pune Recruitment 2024 : शुल्क

जे उमेदवार खुल्या वर्गातील आहेत, त्यांच्यासाठी ९५०/- रुपये शुल्क आकारला जाईल.
जे उमेदवार राखीव वर्गातील आहेत, त्यांच्यासाठी ८५०/- रुपये शुल्क आकारले जाईल.

MSCE Pune Recruitment 2024 – पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिकृत वेबसाईट –
https://www.mscepune.in/

MSCE Pune Recruitment 2024 – अधिसूचना
https://www.mscepune.in/gcc/path/LipikJahirat.pdf

MSCE Pune Recruitment 2024 – अर्जाची लिंक
https://ibpsonline.ibps.in/mscepdec23/

MSCE Pune Recruitment 2024 : अर्ज प्रक्रिया

मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक यापैकी कोणत्याही पदावर नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराने नोकरीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी अधिसूचनेमध्ये दिलेल्या लिंकचा वापर करावा.
तसेच नोकरीचा अर्ज भरताना आपली संपूर्ण आणि आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे.
अर्जासह आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावीत.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे १८ ते ४३ वर्षे यादरम्यान असावे.

या नोकरीसंदर्भात उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना तसेच नोकरी अर्जाची लिंक वर नमूद केलेली आहे.