सुहास पाटील
नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील ‘अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील गट-क’ संवर्गातील रिक्त पदांची सरळसेवा भरती. (जाहिरात क्र. ७२५/पी.आर. दि. ०५.१२.२०२३) एकूण रिक्त पदे – ३५०.
( I) अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) – २९७ पदे (अजा – ३७, अज – २३, विजा-अ – ७, भज-ब – ५, भज-क – १२, भज-ड – ५, विमाप्र – ३, इमाव – ५०, आदुघ – ३०, खुला – १२५) (वेतन श्रेणी – एस-६ रु. १९,९०० – ६३,२०० अंदाजे वेतन रु. ३४,५००/-).
पात्रता – (दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी) (१) १० वी उत्तीर्ण, (२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/ अखिल भारतीय स्थानिय स्वराज्य संस्था यांचेकडील), (३) एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र. ( I), ( III) ते ( V) किमान शारीरिक पात्रता – (अ) उंची – पुरुष – १६५ सें.मी.; महिला – १६२ सें.मी. (बी) छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी. (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.) (क) वजन – किमान ५० कि.ग्रॅ. (ड) दृष्टी – चांगली.
वयोमर्यादा – ३२ वर्षेपर्यंत (खुला प्रवर्ग, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ सर्वांसाठी) प्रावीण्यप्राप्त खेळाडू – ३५ वर्षे, प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त – ४५ वर्षे, अंशकालीन पदवीधर उमेदवार – ५५ वर्षे.
सर्व पदांकरिता शारीरिक क्षमता चाचणी – (१) १५ फूट दोर चढणे – १५ गुण, (२) १०० मीटर्स अंतर ५० कि.ग्रॅ. मानवी प्रतिकृती खांद्यावर घेवून धावणे – १५ गुण, (३) शिडी चढणे-उतरणे – १५ गुण, (४) उंची अधिक असल्यास – ५ गुण, (५) पोहणे – २० गुण. एकूण ७० गुण.
( II) फिटर कम ड्रायव्हर – ०५ पदे (विजा-अ – १, इमाव – १, आदुघ – १, खुला – २) (वेतन श्रेणी – एस-८ रु. २५,५०० – ८१,१०० अंदाजे वेतन रु. ४५,०००/-).
पात्रता – (१) १० वी उत्तीर्ण, (२) आयटीआयमधील मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ समकक्ष कोर्स उत्तीर्ण, (३) जड वाहन चालविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव, (४) जड वाहन चालविण्याचा परवाना, (५) एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – १८ ते ३५ वर्षे; आरक्षित प्रवर्ग – १८-४० वर्षे.
( III) चालक यंत्रचालक (Driver Operator) – २८ पदे (अजा – २, अज – ४, भज-ब – २, भज-ड – १, इमाव – ४, आदुघ – ३, खुला – १२) (वेतन श्रेणी – एस – ८ रु. २५,५०० – ८१,१०० अंदाजे वेतन रु. ४५,०००/-).
पात्रता – (१) १० वी उत्तीर्ण, (२) जड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव, (३) जड वाहन चालविण्याचा परवाना, (४) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य. उमेदवाराने राज्य अग्निशमन प्राक्षिण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्यांना सदर प्रशिक्षण केंद्राचा ३ महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक.
वयोमर्यादा – ३२ वर्षेपर्यंत.
( IV) उपअग्निशमन अधिकारी (Sub- officer) गट-क – १३ पदे (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – ५) (वेतन श्रेणी – एस -१३ रु. ३५,४०० – १,१२,४०० अंदाजे वेतन रु. ६०,०००/-).
( V) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गट-क – ७ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, आदुघ – १, खुला – ३) (वेतन श्रेणी – एस -१४ रु. ३८,६०० – १,२२,८०० अंदाजे वेतन रु. ६८,०००/-).
पद क्र. ( IV) व ( V) साठी पात्रता – (१) पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण, (२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा उपअग्निशमन अधिकारी कोर्स पूर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स पूर्ण किंवा दि इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअर्स (यू.के.) किंवा (इंडिया) या संस्थेकडील ग्रेड-आय परीक्षा उत्तीर्ण, (३) एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – सरळसेवेच्या उमेदवारांसाठी ३७ वर्षे. शासकीय निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ४७ वर्षे.
अनुभव – सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी पदासाठी ‘अ’ वर्ग महानगरपालिका/ शासकीय/निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये उपअग्निशमन अधिकारी या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान ३ वर्षं सेवा पूर्ण केलेली असावी किंवा ‘ब’ व ‘क’ वर्ग महानगरपालिकेमध्ये उपअग्निशमन अधिकारी या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान ५ वर्षं सेवा पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – सरळसेवेच्या उमेदवारांसाठी ४२ वर्षे. शासकीय/ निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट नाही.
रिक्त पदांच्या ३० टक्के जागा महिलांसाठी, १५ टक्के जागा माजी सैनिकांसाठी, खेळाडूंसाठी ५ टक्के जागा, भूकंपग्रस्तांसाठी २ टक्के जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी ५ टक्के जागा, अंशकालीनसाठी १० टक्के जागा, अनाथांसाठी १ टक्के जागा राखीव आहेत.
अग्निशमन व आणीबाणी सेवेतील पदांसाठी पोहणे आवश्यक असल्याने पोहता न येणाऱ्या उमेदवारांना पुढील चाचणीकरिता अपात्र ठरविण्यात येईल.
लेखी परीक्षेतून रिक्त पदांच्या १: ५ किंवा १: ७ प्रमाणात उमेदवारांना शारीरिक चाचणी परीक्षेस पात्र करण्यात येईल.
पुढील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी एमएस-सीआयटी प्रमाणपत्र – समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.
(१) १० वी/१२ वीची परीक्षा संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेवून उत्तीर्ण.
(२) D. O. E. A. C. C./ N. E. I. L. I. T., नवी दिल्लीचे प्रमाणपत्र.
(३) संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयातील पदविका/ पदवी उत्तीर्ण इ.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ – रु. ९००/-.
निवड पद्धती – सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. प्रत्येक प्रश्नास १ गुण राहील. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल. लेखी परीक्षेत पात्रतेसाठी मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्के गुण आणि खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक.
सर्व पदांसाठी मौखिक (मुलाखती) परीक्षा घेण्यात येणार नाही.
लेखी परीक्षा १०० गुण, शारीरिक पात्रता व शारीरिक चाचणी ७० गुण यामध्ये उमेदवारांनी एकूण १७० गुणांपैकी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूचीतून गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
चालक यंत्रचालक या पदाकरिता लेखी परीक्षा नसून वरील सर्व शारीरिक पात्रता व शारीरिक क्षमता चाचणीसह प्रत्यक्ष जड वाहन चालविणेबाबत चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. त्यास एकूण ३० गुण असतील. असे एकूण १०० (७० अधिक ९३०) गुणांपैकी प्राप्त एकूण गुणानुसार चालक यंत्रचालक या पदाकरिता गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
अंतिम निवड यादी www. nmcnagpur. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व पदांकरिता (चालक यंत्र चालक पद वगळता) लेखी परीक्षेत मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रत्येकी १५ प्रश्न व तांत्रिक ४० प्रश्न असे एकूण १०० प्रश्न विचारले जातील.
जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत नागपूर महानगरपालिकेच्या www. nmcnagpur. gov. in या संकेतस्थळावरील आणि विहीत कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणेविषयी माहिती पॅरा १६ व १७ मध्ये उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज www. nmcnagpur. gov. in या संकेतस्थळावर दि. २७ डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत.
