Mahavitaran Recruitment 2024 : तरुण मंडळी नेहमी चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. शिकाऊ उमेदवारांसाठी एक सुर्वण संधी आहे. विशेषत: नागपूर विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे वेळ न घालवता इच्छुक उमेदवारांनी या संधीचे सोने करावे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावा. या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती असावी, वयोमर्यादा किती असावी, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज कसा करावा, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर टेन्शन घेऊ नका. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • पदाचे नाव – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
  • पदसंख्या – शिकाऊ उमेदवाराच्या पदासाठी एकूण ६० रिक्त जागा आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.
  • नोकरी ठिकाण – पात्र उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे नागपूर असेन त्यामुळे नागपूरकर या संधीचा फायदा घेऊ शकतात.
  • वयोमर्यादा – या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय १८ ते ३२ वर्ष इतके असावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२४ आहे. त्यामुळे वेळ न घालवता लगेच अर्ज करावा.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटवर जाऊन भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा /SSC/ITI उत्तीर्ण असावा.

हेही वाचा : NTPC Recruitment 2024 : एनटीपीसीमध्ये नोकरीची उत्तम संधी! ‘या’ पदांच्या १०१ जागांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज

Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

कर्ज कसा करावा?

  • http://www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी.
  • शैक्षणिकदृष्ट्या पात्र असलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
  • अर्ज हा ऑनलाईन भरावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२५ फेब्रुवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर दिलेली माहिती नीट वाचावी.