NBCC Recruitment 2024 : तुम्ही जर ॲग्रिकल्चर, सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिक इंजिनिअर असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये ही भरती होणार आहे. यानुसार जनरल मॅनेजर, ??? डिशनल जनरल मॅनेजर,??? डेप्युटी जनरल मॅनेजर, ज्युनियर इंजिनिअरसह एकूण ९३ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवार २७ मार्च २०२४ पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक तपशील आपण पुढे जाणून घेऊ..

पदाचे नाव आणि तपशील

१) जनरल मॅनेजर – ३
२) ॲडिशनल जनरल मॅनेजर – २
३) डेप्युटी जनरल मॅनेजर – १
४) मॅनेजर – २
५) प्रोजेक्ट मॅनेजर – ३
६) डेप्युटी मॅनेजर – ६
७) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर – २
८) सीनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव – ३०
९) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW) – ४
१०) ज्युनियर इंजिनिअर – ४०

शैक्षणिक पात्रता

१) जनरल मॅनेजर
६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Architecture) आणि १५ वर्षे अनुभव.

२) ॲडिशनल जनरल मॅनेजर
इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance), १२ वर्षे अनुभव,

३) डेप्युटी जनरल मॅनेजर
६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil), ९ वर्षे अनुभव.

४) मॅनेजर
६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) आणि ६ वर्षे अनुभव

५) प्रोजेक्ट मॅनेजर
६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) आणि ६ वर्षे अनुभव

६) डेप्युटी मॅनेजर
६०% गुणांसह MBA/MSW किंवा मॅनेजमेंटमध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) आणि ३ वर्षांचा अनुभव

७) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर
६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) आणि ३ वर्षे अनुभव.

८) सीनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव
६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) आणि २ वर्षे अनुभव

९) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW)
६०% गुणांसह LLB

१०) ज्युनियर इंजिनिअर
६०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Electrical)

वयाची अट

२७ मार्च २०२४ रोजी वय २८ ते ४९ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
(SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट)

(प्रत्येक पदानुसार वयाची अट बदलणारी आहे. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचा.)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

१) SC/ST/PWD: फी नाही
२) पद १ ते ८ आणि १० General/OBC/EWS: १००० रुपये
३) पद ९ General/OBC/EWS: ५०० रुपये.

अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्ज : Online अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा.