NEET Success Story: जर जिद्द असेल तर परिस्थिती कशीही असो व्यक्ती आपलं ध्येय जरूर गाठते असं म्हणतात. झारखंडमधील जमशेदपूर येथील एका सामान्य कुटुंबातील रोहित कुमारने ही गोष्ट खरी करून दाखवली. आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने त्याने हे सिद्ध केलं की तुमच्या आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी, जर तुमच्यात काहीतरी करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
तिसऱ्या प्रयत्नात यश
रोहित कुमारने NEET UG परीक्षा २०२५ (NEET २०२५) ७२० पैकी ५४९ गुण मिळवून उत्तीर्ण कोली. यापूर्वी तो दोनदा NEET परीक्षेला बसला होता परंतु, तेव्हा त्याला यश मिळाले नव्हते. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने ही परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला आहे. त्याचे यश आपल्या सर्वांना शिकवते की तुम्ही कितीही वेळा अपयशी ठरलात तरी कधीही हार मानू नका तर अधिक मेहनत करा आणि तुमचे ध्येय गाठा.
व्हिडिओ होतोय व्हायरल
यावर्षीच्या NEET परीक्षेत रोहितने १२,४८४ वा ऑल इंडिया रँक आणि देशभरात १,३१२ वा कॅटेगरीचा रँक मिळवला. त्याच्या यशानंतर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. यासोबतच त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर रोहितच्या यशावर देशातील प्रसिद्ध ऑनलाइन शिक्षक आणि फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे स्वतः त्याला भेटायला गेले होते, ज्याचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
दिवसा दुकान आणि रात्री अभ्यास
माध्यमांना मुलाखत देताना रोहित म्हणाला की, त्याला इतका उच्च क्रमांक मिळेल असे त्याला वाटले नव्हते. त्याला वाटले होते की त्याला एखाद्या सामान्य महाविद्यालयात प्रवेश मिळेल, परंतु तो या क्रमांकावर खूश आहे. त्याने सांगितले की दररोज सकाळी उठल्यानंतर तो प्रथम अभ्यास करायचा. त्यानंतर तो सकाळी ८ वाजता दुकान उघडायला जायचा आणि दुपारी १२ वाजता दुकान बंद करून घरी यायचा. त्यानंतर तो रात्री १२-१ वाजेपर्यंत जागे राहून नीटची तयारी करायचा. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन रोहितने हे सिद्ध केले आहे की जर स्वप्ने मोठी असतील आणि त्यावर कठोर परिश्रम केले तर मार्ग स्वतःच तयार होतात.