NHPC Recruitment 2023: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पेारेशनमध्ये लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे. संस्थेने या संदर्भामध्ये एक सूचनापत्रक जाहीर केले आहे. या सूचनापत्रकानुसार एनएचपीसी या संस्थेमध्ये अपरेंटिस या पदांसाठी एकूण २५ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. एनएचपीसीच्या nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटवर भरतीशी संबंधित सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
भरतीमध्ये सहभाग घेण्याऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० यांमध्ये असावे अशी अट या संस्थेने घातली आहे. एनएचपीसीमध्ये अपरेंटिस म्हणून काम करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे आवश्यक आहे. आयटीआयमध्ये मिळलेल्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. म्हणजेच मिळालेल्या गुणांवरुन त्यांची प्राथमिक परीक्षण केले जाईल. मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.
एनएचपीसीमध्ये अपरेंटिस या पदासाठी दर महिन्याला ७,७०० रुपये वेतन म्हणून दिले जातील. पण उमेदवारांना टीए (प्रवास भत्ता) /डीए (महागाई भत्ता) दिला जाणार नाही. या भरतीसाठी ३१ मे पर्यंत उमेदवार ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. २१ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यादिवशी उमेदवारांना अर्ज आणि त्यांसह लागणाऱ्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी संस्थेच्या कार्यालयाच्या पत्त्यावर स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टच्या माध्यमाून पाठवावे लागेल.
NHPC च्या भरतीसाठी अर्ज करायच्या स्टेप्स –
- सर्वप्रथम nhpcindia.com या वेबसाइटवर जा.
- होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर एनएचपीसी भरतीच्या लिंकवर क्लिक करुन अर्ज करा.
- वेबसाइटवरील अर्जामध्ये योग्य तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.
- सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जाच्या २-३ प्रिंट काढून स्वत:कडे सांभाळून ठेवा.
अर्ज केल्यानंतर भरतीसंबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी nhpcindia.com या वेबसाइटची मदत घ्यावी.