NIRT Bharti 2023 : राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था (ICMR) येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर – १ पदांच्या एकूण ७६ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था भरती २०२३ –
पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर – १
एकूण पद संख्या – ७६
शैक्षणिक पात्रता –
- तांत्रिक सहाय्यक – संबंधित विषयात पदवी
- प्रयोगशाळा परिचर – ITI आणि १० वी पास.
(शैक्षणिक पात्रता पदानुसार असून यासाठी भरतीची जाहिरात अवश्य पाहा)
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०२३
हेही वाचा- रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या
पगार –
- तांत्रिक सहाय्यक – ३५ हजार ४०० रुपये ते १ लाख १२ हजार ४०० रुपयांपर्यंत.
- प्रयोगशाळा परिचर १ – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपयांपर्यंत.
अधिकृत वेबसाईट – https://nirt.res.in/
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://joinicmr.in/login/user
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1gr2tNUL2a3QQISJpjDTHgOeBNyNjBOGc/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.