NMDC Recruitment 2023: राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) ने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. उमेदवार अधिकृत साइट nmdc.co.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी आहे. तर अर्जाची प्रक्रिया २७ जानेवारीपासूनच सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये एकूण ४२ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. या मोहिमेद्वारे प्रशासकीय अधिकारी (वित्त लेखा) प्रशिक्षणार्थीची ११ पदे,
प्रशासकीय अधिकारी (साहित्य व खरेदी) प्रशिक्षणार्थीची १६ पदे आणि प्रशासकीय अधिकारी (पर्सनल व प्रशासन) प्रशिक्षणार्थीची १५ पदे भरती करण्यात येणार आहेत.

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता

  • प्रशासकीय अधिकारी (वित्त लेखा) प्रशिक्षणार्थी: उमेदवारांनी CA (इंटर)/ ICWA-CMA (इंटर) सह पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • प्रशासकीय अधिकारी (सामग्री आणि खरेदी) प्रशिक्षणार्थी- उमेदवार अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • प्रशासकीय अधिकारी (पर्सनल आणि प्रशासन) प्रशिक्षणार्थी – उमेदवार समाजशास्त्र/समाजकार्य/कामगार कल्याण/पर्सनल व्यवस्थापन/एचआरएम किंवा पीजी डिप्लोमा किंवा त्याच्या समकक्ष मध्ये PG सह पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ३२ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

एवढा मिळेल पगार

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना ३७ हजार रुपये ते १ लाख ३० हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

( हे ही वाचा: इंजिनियरिंग पास आहात? तर आजच ‘या’ यूनिवर्सिटी मध्ये नोकरीसाठी अर्ज करा; १.७५ लाखांपर्यंत मिळेल पगार)

अशा प्रकारे होईल निवड

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाईल.

महत्वाची माहिती

उमेदवाराला भरतीसाठी अर्ज करताना काही अडचण आल्यास ७०४४५९९०६१ या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करता येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmdc recruitment 2023 apply for various posts at nmdc co in gps
First published on: 14-02-2023 at 20:27 IST