NDA Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमीने आर्मी, नेव्ही, एअर फोर्स पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जानेवारी २०२४ आहे. राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी भरती २०२४ –
परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा (NDA & NA) (I) 2024.
एकूण रिक्त पदे – ४००
पदाचे नाव –
राष्ट्रीय संरक्षण अकादमी –
- लष्कर (Army) – २०८
- नौदल (Navy) – ४२
- हवाई दल (Air Force) – १२०
- नौदल अकादमी – ३०
शैक्षणिक पात्रता –
- लष्कर – १२ वी पास.
- नौदल, हवाई दल व नौदल अकॅडमी – फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयासह १२ वी पास.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
हेही वाचा- कोकण रेल्वेत नोकरीची मोठी संधी! विविध पदांच्या ३२ जागांसाठी भरती सुरु, मुलाखतीची तारीख जाणून घ्या
अधिकृत वेबसाईट –
https://upsc.gov.in/
वयोमर्यादा –
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जुलै २००५ ते १ जुलै २००८ या दरम्यानचा असावा.
भरतीसाठी अर्ज फी –
- खुला आणि ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणतीही फी नाही.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याचा कालावधी
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १७ डिसेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२४ सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य वाचा.
https://drive.google.com/file/d/1YOKuMxGrSPE5SWfbQHz_vO5i4dvo6EHK/view