पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे.
हेही वाचा- ७ वी पास असणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर
भरतीबाबतची अधिक माहिती पाहण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
दरम्यान, जुना आकृतिबंध तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात तयार केला होता. त्याला राज्य शासनाने मंजुरीही दिली होती. मात्र, नोकरभरतीस बंदी असल्याने तसेच कोरोना महामारीमुळे ती पदे भरता आली नाहीत. केवळ वैद्यकीय, आरोग्य तसेच अत्यावश्यक विभागातील नोकर भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे ११ हजार ५१३ पैकी केवळ ७ हजार ५३ पदे सध्या कार्यरत होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने ही पदभरती करण्यात येणार आहे.
हेही वाचा- MCA Recruitment 2023: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु
मे महिन्यात ‘या’ जागांसाठी भरती –
महापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले आहेत. तर वरील पदासांठीती परीक्षा मे महिन्यामध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
भरतीसाठीच्या अधिकच्या सविस्तर माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/index.php या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.