MCA Recruitment 2023: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरु झालेल्या भरतीविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या..

MCA Recruitment 2023
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन भरती २०२३ (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

MCA Recruitment 2023: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नुकतीच भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या संस्ठेद्वारे संबंधित सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आले. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. https://www.cricketmaharashtra.com/ या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंबंधित माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील मुख्य संचालन अधिकारी (Chief Operating Officer – COO) या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २३ मार्च २०२३ ला सुरुवात झाली आहे. तर १० एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवार संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तसेच ते applycoomca@yahoo.com या ईमेल आयडीवरुन मेल करुन नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

आणखी वाचा – केंद्र सरकारच्या ‘या’ विभागामध्ये होतेय बंपर भरती, जाणून घ्या निवड प्रक्रिया, पात्रता व अन्य निकष

नोकरी मिळवण्यासाठी भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून बिझनेस मॅनेजमेन्ट किंवा बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्याकडे क्रीडा क्षेत्रामध्ये वरिष्ठ व्यवस्थापनाचा सहा ते आठ वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे. भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, मुलाखत यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामार्फत योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल. संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भातील अपडेट्स दिले जातात. उमेदवार भरतीशी निगडीत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 15:47 IST
Next Story
RBI Pharmacist Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट पदांसाठी भरती, प्रति तासासाठी मिळणार ४०० रुपये पगार; जाणून घ्या डिटेल्स
Exit mobile version