नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ही एक नामांकित संस्था आहे. जी सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ही संस्था देशातील अनेक विभागांमधील आणि विविध विषयांतील अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारकांची मोठ्या संख्येने भरती करत असते.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या अधिसूचनेनुसार, एचआर विभागात कनिष्ठ अधिकारी पदांसाठीच्या ४८ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ ही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता PGCIL च्या अधिकृत बेसाईटला अवश्य भेट द्या.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ –
पात्रता निकष –
उमेदवारांनी ६०% गुणांसह BBA/ BBM/ BBS किंवा मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा – १० ते २७ वर्षादरम्यान.
अर्ज शुल्क –
- सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी – ३०० रुपये.
- SC, ST आणि इतर प्रवर्गासाठी अर्ज शुल्क नाही.
पगार – या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना २७ हजार ५०० रुपये महिना पगार दिला जाणार आहे.
हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये ‘या’ ३२० पदासांठी भरती सुरु, आजच अर्ज करा
PGCIL Recruitment साठी असा करा अर्ज –
- अर्ज करण्यासाठी सर्वात आधी careers.powergrid.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइटच्या होम पेजवर करिअरच्या लिंकवर क्लिक करा.
- PGCIL भरती २०२३ च्या अधिकृत साईटला भेट द्या.
- रजिस्ट्रेशन करा.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्ज भरू शकता.