सुहास पाटील

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ( RBI) (RBI आपल्या मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली रिजन अंतर्गत येणाऱ्या ४ झोन्समध्ये) ज्युनियर इंजीनिअर (सिव्हील/ इलेक्ट्रिकल) पदांची भरती करणार आहे. एकूण रिक्त पदे – ३५. मुंबई विभागातील  RBI ची कार्यालये  West Recruitment Zone अंतर्गत येतात.

(१) ज्यु. इंजीनिअर (सिव्हील) – एकूण २९ पदे (वेस्ट झोनमधील पदे – एकूण – ११ (अजा – २, अज – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५); १ पद माजी सैनिकांसाठी राखीव; प्रत्येकी १ पद दिव्यांग कॅटेगरी  B( D/HH) आणि  C(LD/CP etc. साठी राखीव).

(२) ज्यु. इंजिनिअर (इलेक्ट्रिशियन) – एकूण ६ पदे (वेस्ट झोनमधील पदे – एकूण – ४ – (अज – २, खुला – २) (१ पद दिव्यांग कॅटेगरी  C(LD/ CP etc. साठी राखीव).

अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे उमेदवार जरी रिक्त पदे राखीव नसल्यास अर्ज करण्यास पात्र आहेत. रिक्त पदे नसल्यास त्यासाठी असलेले आरक्षणाचे फायदे त्यांना घेता येणार नाहीत.

वयोमर्यादा : दि. १ जून २०२३ रोजी २० ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/ अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे; पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला – ३५ वर्षे, अजा/ अज – ४० वर्षे).

पात्रता : दि. १ जून २०२३ रोजी संबंधित विषयातील इंजीनिअरींग डिप्लोमा किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/ अज/ दिव्यांग – ५५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा संबंधित विषयातील इंजीनिअरींग पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/ अज/दिव्यांग – ४५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

ज्यु. इंजीनिअर इलेक्ट्रिकल पदांसाठी इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरींग पदविका/ पदवीधारक उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

CGPA/  OGPA/  CPI किंवा तत्सम गुणांकन पद्धत असल्यास १० पॉईंट स्केलवर ६.७५ चे सरासरी ६० टक्के गुण, ६.२५ चे सरासरी ५५ टक्के गुण व ५.७५ चे सरासरी ५० टक्के गुण पकडले जातील.

निवड पद्धती : ऑनलाइन एक्झामिनेशन आणि (i) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट (LPT) – ३०० गुणांची ऑनलाइन टेस्ट १५ जुलै २०२३ रोजी घेतली जाईल. (१) इंग्लिश लँग्वेज – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४० मिनिटे. (२) इंजीनिअरींग डिसिप्लिन पेपर-१ – ४० प्रश्न, १०० गुण, वेळ ४० मिनिटे. (३) इंजीनिअरींग डिसिप्लिन पेपर-२ – ४० प्रश्न, १०० गुण, वेळ ४० मिनिटे. (४) जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझिनग – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे. एकूण १८० प्रश्न, ३०० गुण, वेळ १५० मिनिटे.

(ii) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट (LPT) – जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण करतील, त्यांनी ज्या झोनमधील पदांसाठी अर्ज केला आहे, तेथील स्थानिय भाषेतील लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. वेस्ट झोनसाठी मराठी, गुजराती, कोकणी या स्थानिय भाषा नेमून दिलेल्या आहेत.

लेखी परीक्षा अंदाजे १५ जुलै २०२३ रोजी आयोजित केली जाईल.

परीक्षा केंद्र : अहमदाबाद/ गांधीनगर, पुणे, मुंबई/ नवी मुंबई, नागपूर, पणजी इ.

परीक्षा शुल्क : अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक – रु. ५०/- + GST; खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ४५०/- + GST.

शंकासमाधानासाठी  http://cgrs.ibps.in/ / या लिंकवर संपर्क साधावा. विषयात Recruitment of Junior Engineer( Civil/Electrical)  PY 2022 असे नमूद करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज  http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर दि. ३० जून २०२३ पर्यंत करावेत.