Railway jobs notification 2025:  जर तुम्ही रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे लवकरच एक मोठी भरती जाहीर करणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) अंतर्गत पदवीधर स्तरावरील भरती २०२५ साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण ५८१० रिक्त जागांची घोषणा करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा:

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आणि फी भरण्यासाठी खालील तारखा लक्षात ठेवणे आवश्यक आहे:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात: २१ ऑक्टोबर २०२५
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० नोव्हेंबर २०२५
  • फी भरण्याची अंतिम तारीख: २२ नोव्हेंबर २०२५
  • अर्ज दुरुस्तीसाठी विंडो: २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५

अर्ज शुल्क तपशील:

सामान्य / ओबीसी उमेदवारांसाठी: ५०० रुपये (४०० रुपये CBT-1 मध्ये हजर झाल्यावर परत केले जातील).
एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस / महिला / अपंग (PwBD) उमेदवारांसाठी: २५० रुपये (CBT-1 मध्ये हजर झाल्यावर संपूर्ण रक्कम परत केली जाईल).

पात्रता निकष: शैक्षणिक आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास, १ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे असणे गरजेचे आहे.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत दिली आहे: अनुसूचित जाती (SC) आणि जमाती (ST) च्या उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC – Non-Creamy Layer) उमेदवारांना ३ वर्षांची वयाची सवलत मिळेल.

RRB NTPC भरती 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • RRB च्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट द्या.
  • वन-टाईम रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
  • आपल्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून लॉगिन करा आणि “Graduate Level Posts under CEN 06/2025” साठी अर्ज भरा.
  • आवश्यक स्कॅन केलेली कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट घेऊन ठेवा.