RRC SECR Recruitment 2023 : रेल्वे विभागात नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) द्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत काही पदांची थेट भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२३ ही आहे. भरतीसाठी ४६ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२३

एकूण रिक्त पदे – ४६

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी, तसेच मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास, १० वी पास.

वयोमर्यादा –

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. पात्रतेशी संबंधित अधिकती माहिती जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य पाहा.

हेही वाचा- पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या २८८ जागांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरुवात – १४ ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://secr.indianrailways.gov.in

भरती प्रक्रिया –

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जाईल.
  • चाचणीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना भरतीच्या पुढील टप्प्यासाठी आमंत्रित केले जाईल.
  • चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना ४० पैकी २५ गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
  • गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

पगार –

भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना स्तर ४/५ आणि CPC ७ नुसार पगार दिला जाईल.