SAIL Recruitment 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड SAIL ने भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ‘ऑपरेटर-कम-टेक्निशियन (ट्रेनी)’ या पदासाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SAIL च्या अधिकृत वेबसाइट sail.co.in वर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार १८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

SAIL Recruitment 2024: तर ‘या’ भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज फी आणि अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…

रिक्त पदे : या भरती मोहिमेद्वारे संस्थेत ३४१ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा : ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खाली दिलेल्या लिंकवर तपासून पाहू शकतात.

लिंक : https://d1cmkr5tdoeyjk.cloudfront.net/sail/pdf/FULL%20ADVT%2001_2024_OCTT%20(1).pdf

हेही वाचा…नोकरी शोधताय? मुंबईत DGR द्वारे ‘जॉब फेअर’चे आयोजन; जाणून घ्या सर्व तपशील

निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांची संगणक आधारित चाचणी (CBT) हिंदी / इंग्रजीमध्ये घेण्यात येईल. संगणक आधारित चाचणी परीक्षेत दोन विभागांमध्ये एकूण १०० प्रकारचे प्रश्न असतील. जसे की, डोमेन (Domain) ज्ञानावरील ५० आणि अभियोग्यता चाचणीवर ५० प्रश्न असतील. संगणक चाचणी परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे असेल. वरील पदांसाठी संगणक आधारित चाचणी परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने कौशल्य चाचणीसाठी प्रत्येक पद / विषयासाठी १.३ गुणोत्तराने निवडले जाईल.

अर्ज फी : सामान्य / ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज आणि प्रक्रिया शुल्क ५०० रुपये आहे, तर एससी / एसटी/ पीडब्ल्यूबिडी / ईएसएम विभागीय उमेदवारांसाठी प्रक्रिया शुल्क २०० रुपये आहे. उमेदवारांना नेट बँकिंग / क्रेडिट कार्ड / एटीएम कम डेबिट कार्डद्वारे अर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. इतर कोणत्याही पद्धतीने शुल्क भरल्यास स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल ?
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी SAIL च्या वेबसाइट http://www.sail.co.in द्वारे ‘करिअर’ पेजवर किंवा http://www.sailcareers. com वर अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.