TISS Mumbai recruitment 2024 : मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये लेखा सहायक म्हणजेच अकाउंट असिस्टंट पदावर भरती होणार आहे. या पदासाठी नोकरीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि पात्रता निकष काय आहेत ते जाणून घ्या. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख पाहा.

TISS Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये लेखा सहायक या पदासाठी एकूण तीन जागांवर भरती होणार आहे.

TISS Mumbai recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

लेखा सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वाणिज्य शाखेतील बी.कॉम. [B.com] पदवी असणे आवश्यक आहे अथवा वाणिज्य शाखेत एम.कॉम.मधील [M.com] पदवी असावी.

हेही वाचा : Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा

TISS Mumbai recruitment 2024 : वेतन

लेखा सहायक या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला दरमहा २५,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

TISS Mumbai recruitment 2024 – मुंबईच्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अधिकृत वेबसाईट
https://www.tiss.edu/

TISS Mumbai recruitment 2024 – अधिसूचना
https://tiss.edu/uploads/files/Account_Assist_04.04.2024_IKZlBgU.pdf

TISS Mumbai recruitment 2024 – अर्जाची लिंक
https://recruitment.tiss.edu/

TISS Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

लेखा सहायक पदावर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करताना उमेदवाराने आपली संपूर्ण आणि अचूक माहिती अर्जामध्ये भरणे अपेक्षित आहे.
अर्ज केल्यानंतर नोकरीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासाठी शुल्क –

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारास ५००/- रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
मात्र, उमेदवार SC/ST/PWD वर्गातील असल्यास आणि अर्जासह त्यासंबंधी कागदपत्रे जोडल्यास उमेदवाराला २५०/- रुपये शुल्क भरावे लगेल.

लेखा सहायक पदासाठी उमेदवाराने अंतिम तारखेआधी अर्ज करावा. अर्जाची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२४ अशी आहे.

वरील पदाच्या नोकरीसंबंधी उमेदवाराला अधिक माहिती हवी असल्यास मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना आणि अर्जाची लिंक वर नमूद केलेली आहे.