UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

खालीलपैकी असत्य असलेले विधान निवडा :

१) संवाद प्रणाली अर्थव्यवस्थेच्या, सामाजिक संबंधांच्या विकासास हातभार लावते आणि सांस्कृतिक एकात्मता वाढविण्यात मदत करते.

२) दळणवळणामध्ये केवळ शब्द, संदेश आणि कल्पनांचा समावेश असतो.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त २

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्हीं नाहीत

प्रश्न क्र. २

तिस्ता पाणी वाटप करारावर स्वाक्षरी करणारे खालीलपैकी दोन देश कोणते?

अ) भारत-चीन

ब) भारत-बांगलादेश

क) भारत-भूतान

ड) भारत-म्यानमार

प्रश्न क्र. ३

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) पोस्टल नेटवर्क, टेलिकॉम (टेलिफोन, टेलिग्राफ, टेलेक्स इ.) द्वारे वैयक्तिक संवाद होतो.

२) भारताचे पहिले टपाल तिकीट १८५२ मध्ये कराची येथे जारी करण्यात आले.

३) देशातील टपाल सेवा नियंत्रित करणारा कायदा, भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, १८९८ आहे.

४) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत

प्रश्न क्र. ४

पुढीलपैकी योग्य विधान निवडा.

१) टेलिग्राफ, टेलिफोन, टेलेक्स आणि फॅक्स ही दूरसंचाराची मुख्य माध्यमे आहेत.

२) दूरसंचाराचा उदय थेट इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी जोडलेला नाही.

३) चीन हे जगातील दुसरे सर्वात मोठे टेलिफोन नेटवर्क आहे.

४) २००४ मध्ये ब्रॉडबँड धोरण जाहीर झाले.

पर्यायी उत्तरे :

१) २ आणि ४

२) २ आणि ३

३) १ आणि ४

४) १, २ आणि ३

प्रश्न क्र. ५

पुढील विधाने विचारात घ्या.

१) दूरसंचाराने दळणवळण प्रणालीत क्रांती घडवून आणली.

२) दूरध्वनी, रेडिओ, दूरचित्रवाणी, फॅक्स, इंटरनेट इत्यादींच्या साहाय्याने जगाच्या कोणत्याही प्रदेशातील लोक एकमेकांशी थेट बोलू शकतात.

पर्यायी उत्तरे :

१) विधान १ आणि विधान २ योग्य असून, विधान २ हे विधान १ चे कारण आहे.

२) विधान १ आणि विधान २ योग्य असून, विधान २ हे विधान १ चे कारण नाही.

३) विधान १ योग्य आणि विधान २ अयोग्य

४) विधान १ अयोग्य आणि विधान २ योग्य

प्रश्न क्र. ६

भारत-रशिया संबंधांसंदर्भात खालील विधानांचा विचार करा :

अ) कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील वीजनिर्मिती युनिट्सच्या बांधकामासंबंधित करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली आहे.

ब) कच्च्या तेलासाठी रशिया हा भारताचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

क) भारत आणि रशिया यांच्यात २+२ बैठक झालेली नाही.

वरीलपैकी किती विधाने योग्य आहेत?

१) फक्त एक

२) फक्त दोन

३) तिन्ही

४) एकही नाही

प्रश्न क्र. ७

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.

१) २३ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली.

२) १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात रेडिओ प्रसारण सुरू झाले.

३) भारताची राष्ट्रीय दूरदर्शन सेवा ही जगातील सर्वात मोठ्या स्थलीय नेटवर्कपैकी एक आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. ८

खालील विधानांचे लक्षपूर्वक वाचन करून अयोग्य असलेले विधान निवडा.

१) दूरदर्शनचे नवीन मनोरंजन चॅनेल, डीडी भारती २६ जानेवारी २००२ रोजी सुरू करण्यात आले.

२) रेडिओ प्रसारण हे वैयक्तिक संवादाचे प्रभावशाली साधन आहे.

३) १९३१ मध्ये अर्देशीर इराणी यांनी आलम आरा हा भारतातील पहिला बोलपट निर्मित केला.

४) १८२२ पासून मुंबईतून प्रकाशित होणारे बॉम्बे समाचार हे गुजराती दैनिक सर्वात जुने वर्तमानपत्र आहे.

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा :

बातम्यांमध्ये असलेला ज्वालामुखीस्थान
दुकोनोन्यूझीलंड
सांता मारियाब्राझील
किलावेअइटली

पर्यायी उत्तरे :

१) फक्त एक

२) फक्त दोन

३) तिन्ही

४) एकही नाही

प्रश्न क्र. १०

काकोरी ट्रेन घटनेसंदर्भात खालील विधानांचा विचार करा :

अ) काकोरी येथील रेल्वे दरोडा ही १९२५ मधील हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची (HRA) पहिली मोठी कारवाई होती.

ब) या घटनेनंतर राजेंद्रनाथ लाहिरी, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि ठाकूर रोशन सिंग यांना फाशी देण्यात आली.

क) संघटनेसाठी निधी गोळा करणे आणि आपले क्रांतिकारी कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे, हा या मागचा महत्त्वाचा हेतू होता.

वरीलपैकी योग्य विधाने ओळखा?

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) फक्त अ

३) ब आणि क

४) वरील सर्व

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १ – ४
प्रश्न क्र. २ – २
प्रश्न क्र. ३ – ४
प्रश्न क्र. ४ – ३
प्रश्न क्र. ५ – १
प्रश्न क्र. ६ – २
प्रश्न क्र. ७ – ४
प्रश्न क्र. ८ – २
प्रश्न क्र. ९ – ४
प्रश्न क्र. १० -४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.