UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १

हरितगृह परिणामांबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे?

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?

अ) अशाश्वत कृषिमुळे (Intensive Agriculture) मोठ्या प्रमाणावर CO2 तयार होतो, जो उष्णता पकडून ठेवतो. त्यामुळे हरितगृह परिणाम घडतो.

ब) जीवाश्म इंधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि अशाश्वत कृषिमुळे (Intensive Agriculture) वातावरणात CO2 आणि H2O यांचा जाड थर तयार होतो. हा थर पृथ्वीवरून होणारे उष्णतेचे उत्सर्जन अडवून धरतो. यामुळे हरितगृह परिणाम घडतो.

क) जीवाश्म इंधनांच्या अतिवापरामुळे तयार झालेली उष्णता वातावरणातील CO2 आणि बाष्प शोषून घेतात. त्यामुळे हरितगृह परिणाम घडतो.

ड) CO2 च्या वाढणाऱ्या पातळीमुळे वातावरणाच्या सर्वात खालच्या थराचे तापमान वाढते. त्यामुळे जागतिक तापमानवाढ होते.

योग्य पर्याय निवडा :

१) अ आणि ब
२) क आणि ड
३) ब साठी क
४) ब आणि ड

प्रश्न क्र. २

खालीलपैकी कोणता पर्याय हरित निवास वायूंचा समूह दर्शवितो?

पर्यायी उत्तरे :

१) कार्बन डायऑक्साइड, ओझोन, क्लोरोफ्लुरोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड्स.

२) कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड्स, इथेन आणि क्लोरोफ्लुरोकार्बन.

३) कार्बन डायऑक्साइड, इथेन, क्लोरोफ्लुरोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईड्स.

४) इथेन, नायट्रोजन ऑक्साईड्स, कार्बन मोनॉक्साईड आणि क्लोरोफ्लुरोकार्बन्स.

प्रश्न क्र. ३

खालीलपैकी कोणत्या परिषदेत/अहवालात शाश्वत विकास संकल्पनेची व्याख्या करण्यात आली होती?

पर्यायी उत्तरे :

१) पॅरिस परिषद
२) ब्रुटलंड आयोग अहवाल
३) वसुंधरा परिषद
४) यापैकी नाही

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी एक नाही?

अ) असमानता कमी करणे
ब) राजकीय समानता करणे
क) दर्जेदार शिक्षण
ड) शुद्ध पाणी आणि आरोग्य्दायक स्वच्छता

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) फक्त ब
३) फक्त क
४) फक्त ड

प्रश्न क्र. ५

मोबाईल फोन टॉवर्समधून रेडिएशन बद्दल अचूक विधान निवडा.

अ) मानवा पेक्षा पक्ष्यांवर मोबाईल रेडिएशनचा परिणाम गंभीर होतो.
ब) टॉवरवर जितके जास्त अँटेना तितका जास्त रेडिएशनचा प्रभाव होतो.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चूक

प्रश्न क्र. ६

बीटी वांग्यासंदर्भातील खालीलपैकी कोणते चिंतेचे विषय नाहीत?

अ) बॉलबॉर्मव्यतिरिक्त इतर किटक आणि फुलपाखरांना होणारी हानी.
ब) मानवी आरोग्यावरील परिणाम.
क) हा वाण आक्रमक तण (Aggressive Weed) ठरू शकतो.
ड) बीटी जनुकांचा इतर वन्य वाणांमध्ये प्रसार व त्यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन.

योग्य पर्याय निवडा.

१) क आणि ड
२) फक्त क
३) अ, ब आणि ड
४) एकही नाही

प्रश्न क्र. ७

खालील दिलेल्या विधानांपैकी योग्य ते विधान निवडा.

अ) महाराष्ट्राला ७,५१७ किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
ब) महाराष्ट्रातील एकूण ७ जिल्ह्यांना समुद्र किनारपट्टी आहे.
क) पालघर जिल्ह्याची सीमा दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे.
ड) महाराष्ट्राचे भौगोलिक दृष्ट्या एकूण ६ पारंपारिक विभाग पडतात.

पर्यायी उत्तरे :

१) अ व ब योग्य
२) ब व क योग्य
३) अ व ड योग्य
४) वरीलपैकी सर्वच योग्य

प्रश्न क्र. ८

खालील जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून नाहीत?

अ) अकोला</p>

ब) वर्धा

क) अमरावती</p>

ड) सिंधुदुर्ग

पर्यायी उत्तरे :

१) अ, ब, क
२) अ, ब
३) अ, ड, ब
४) फक्त ब

प्रश्न क्र. ९

खालील अयोग्य विधाने निवडा.

अ) महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौरस किलो मीटर आहे.
ब) महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार ७२°१६’ आणि ७९°१६’ पूर्व रेखावृत्तदरम्यान आहे.
क) महाराष्ट्राने भारताच्या ९.३% भूभाग व्यापलेला आहे.
ड) महाराष्ट्राचा भारताच्या राज्यांमध्ये एकुणात क्षेत्रफळानुसार दुसरा क्रमांक लागतो.

पर्यायी उत्तरे :

१) अ व क
२) ब व क
३) ब व ड
४) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न क्र. १०

प्रशासकीय विभाग आणि तालुक्यांची संख्या याच्या योग्य जोड्या जुळवा.

अ) नाशिकI) ६४
ब) अमरावती. II) ५४
क) नागपूर. III) ५६
ड) औरंगाबाद (सं. नगर)IV) ७६

पर्यायी उत्तरे :

I IIIII IV
II IIII IV
IV IIII II
IIIIV I II

प्रश्न क्र. ११

कोरल पॉलीप्स साधारणतः …………. अक्षांशांमध्ये मर्यादित असलेल्या उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये वाढतात.

पर्यायी उत्तरे :

१) १५°उ – १५°द
२) ५°उ – ५°द
३) २५°उ – २५°द
४) ३५°उ – ३५°द

प्रश्न क्र. १२

प्रवाळांना जगण्यासाठी सरासरी वार्षिक किती तापमान आवश्यक असते?

पर्यायी उत्तरे :

१) २०°से – २१°से
२) ६०°से – ७७°से
३) २५° से
४) यापैकी नाही

प्रश्न क्र. १३

CEPA कराराबद्दल योग्य विधान/विधाने ओळखा.

१) हा एक प्रकारचा मुक्त व्यापार करार आहे, ज्यामध्ये सेवा, गुंतवणूक आणि बौद्धिक संपदा हक्कांमधील व्यापार व निगोशिएशनचा समावेश आहे.

२) हे मुक्त व्यापार करारांपेक्षा (FTA) अधिक व्यापक आहे, परंतु सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार (CECA) पेक्षा कमी व्यापक आहे.
३) भारताने कॅनडा सोबत २०१० मध्ये CEPA करारावर स्वाक्षरी केली आहे.
४) भारताने कॅनडा सोबत CEPA करारावर स्वाक्षरी केलेली नाही.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १
२) फक्त १ व २
३) फक्त २ व ३
४) फक्त ४

प्रश्न क्र. १४

२०२१ मध्ये, भारत हा कॅनडाचा ……….वा सर्वात मोठा निर्यात भागीदार होता.

पर्यायी उत्तरे :

१) १३
२) १४
३) १५
४) यापैकी नाही

प्रश्न क्र. १५

भारत – कॅनडा द्विपक्षीय संबंधांच्या बाबत अचूक नसलेले विधान निवडा.

पर्यायी उत्तरे :

१) भारताने कॅनडा सोबत १९४९ पासूनच द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले.

२) १९८० च्या दशकातील खलिस्तान मागणी वेळी कॅनडामधेदेखील सिख समुदायाने प्रदर्शने करून खलिस्तानची मागणी केली.

३) पंतप्रधान मोदींच्या २०१५ मधल्या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांना वास्तविकपने चालना मिळाली.

४) वरीलपैकी एकही नाही.

प्रश्न क्र. १६

अयोग्य विधान/ विधाने ओळखा.

१) कॅनडा हा क्षेत्रफळाने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
२) अमेरिका आणि कॅनडा मधील आंतरराष्ट्रीय भूसीमा ही जगातली सर्वांत लांब सीमा आहे.
३) कॅनडा देशाची सागरी सीमेला पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर व हिंद महासागर लागून आहेत.
४) कॅनडा देशाची राजधानी ओटावा आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १
२) १, २, ३
३) १ व २
४) वरीलपैकी सर्व योग्य आहेत.

प्रश्न क्र. १७

कॅनडामध्ये भारतीय वाणिज्य दूतावास खालीलपैकी कोठे आहे?

पर्यायी उत्तरे :

१) टोरंटो
२) व्हँकुव्हर
३) दोन्ही ठिकाणी आहे
४) यापिकी नाही

प्रश्न क्र. १८

खालीलपैकी कोणत्या अधिकाराचा सर्वोच्च न्यायालयाच्या प्राथमिक अधिकारक्षेत्रात समावेश होतो?

अ ) भारत सरकार आणि एक किंवा अनेक घटक राज्ये यांच्यातील विवाद सोडवणे

ब) भारत सरकार आणि कोणतेही घटक राज्य किंवा घटक राज्ये एका बाजूला आणि एक किंवा अनेक घटक राज्ये दुसऱ्या बाजूला यांच्यातील विवाद सोडवणे

क) दोन किंवा अधिक घटक राज्यांतील आपापसातील विवाद सोडवणे

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क
२) ब आणि क
३) फक्त क
४) अ, ब आणि क

प्रश्न क्र. १९

खालील पैकी योग्य विधान ओळखा

अ) राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे संरक्षक आहे.

ब) राज्यघटनेच्या कलम १३३ अन्वये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते,

क) राज्यघटनेच्या अनुच्छेद १३६ अन्वये फौजदारी खटल्यात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. २०

खालील पैकी योग्य विधान/ने ओळखा?

अ) महात्मा गांधी यांना 10 एप्रिल 1919 रोजी रौलेट कायद्याच्या विरोधात पंजाबला जात असताना अटक करण्यात आली होती.

ब) औंध प्रयोग ही 1938 मध्ये सुरु झालेली ब्रिटिश भारतातील ग्राम स्तरीय स्वराज्य चाचणी होती.

क) स्वातंत्र्यपूर्व भारतातील औंध प्रयोग ही एक विलक्षण कल्पना होती, जिथे संस्थानांचे राज्यकर्ते आपली सत्ता सोपविण्यास असंतुष्ट होते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त अ
४) वरील सर्व

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे :

प्रश्न क्र. १- ४
प्रश्न क्र. २- १
प्रश्न क्र. ३- २
प्रश्न क्र. ४- ३
प्रश्न क्र. ५- ३
प्रश्न क्र. ६- ४
प्रश्न क्र. ७- २
प्रश्न क्र. ८- २
प्रश्न क्र. ९- ३
प्रश्न क्र. १०- २
प्रश्न क्र. ११-३
प्रश्न क्र. १२- १
प्रश्न क्र. १३- १
प्रश्न क्र. १४- २
प्रश्न क्र. १५- १
प्रश्न क्र. १६- ३
प्रश्न क्र. १७- ३
प्रश्न क्र. १८- ४
प्रश्न क्र. १९- १
प्रश्न क्र. २० -४