UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १

खालीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

अ) महाराष्ट्रात मुख्यतः एकूण ६ वनांचे प्रकार आढळतात.

ब) वार्षिक पर्जन्य सुमारे २०० सें.मी. किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात व जांभा मृदेच्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये पाहावयास मिळतात.

क) उष्णकटिबंधीय सदाहरीत वनातील वृक्षांची उंची ४५ ते ६० मी. दरम्यान असते.

ड) वरीलपैकी एकही अयोग्य नाही

प्रश्न क्र. २

खालील पैकी योग्य विधान/ने ओळखा?

अ) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानासाठी आर्थिक नियोजनाच्या संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला.

ब) १ एप्रिल १९५१ पासून भारतात आर्थिक नियोजनास सुरुवात करण्यात आली आणि तेव्हापासूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली.

क) भारतात पंचवार्षिक योजनेव्यतिरिक्त सात वार्षिक योजना राबविण्यात आल्या आहेत.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि क
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ३

योग्य जोड्या लावा.

अ) उष्णकटिबंधीय सदाहरीत वने – I) ७५ से.मी. किंवा त्यापेक्षा कमी
ब) उष्णकटिबंधीय आर्द्र पर्णपाती – II) १२० ते १६० से.मी.
क) उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने – III) २०० सें.मी. किंवा त्यापेक्षा जास्त
ड) उष्णकटिबंधीय कटेरी वने – IV) २५० से.मी. किंवा त्यापेक्षा जास्त

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

१) I II III IV
२) II I III IV
३) IV III I II
४) III II IV I

प्रश्न क्र. ४

खालील पैकी अयोग्य विधान/ने ओळखा?

अ) पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी आयातीवरील वाढते अवलंबित्व कमी करणे आणि कृषी क्षेत्राचा विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट नव्हते.

ब) स्वतंत्र भारतामधील पहिल्या निवडणुका म्हणजेच १९५१-५२ मध्ये निवडणुका या पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यानच पार पडल्या.

क) सतलज नदीवर भाक्रा-नानगल धरण हे पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान बांधण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) फक्त क
३) ब आणि क
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ५

कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे?

अ) दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी एआय आधारित रिअल टाईम मॉनिटरिंग सॉफ्टवेअर भारताकडून तैनात करण्यात आली आहे.

ब) कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले अग्नी-डी (AGNI-D) या सर्व्हेलन्स सॉफ्टवेअरमुळे सीमेपलीकडून होणाऱ्या उल्लंघणाला आळा घालणे शक्य होणार आहे.

क) अग्नी-डी (AGNI-D) हे सर्व्हेलन्स सॉफ्टवेअर पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) अ आणि ब
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ६

गेल्या काही दिवसांपासून रफाह सीमा चर्चेत आहे, ही सीमा खालीलपैकी कोणत्या दोन भागांना जोडते?

अ) गाझा पट्टी आणि इस्रायल

ब) गाझा पट्टी आणि भूमध्य समुद्र

क) इस्रायल आणि इजिप्त

ड) गाझा पट्टी आणि इजिप्त

प्रश्न क्र. ७

राष्ट्रीय महामार्गांबाबतीत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

१) भारतातील एकूण राष्ट्रीय महामार्गापैकी फक्त ९.२ टक्के महामार्ग महाराष्ट्रात आहेत.

२) राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

३) राष्ट्रीय महामार्ग मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गचा नवीन क्रमांक १६० व ६० आहे.

४) वरीलपैकी एकही नाही.

प्रश्न क्र. ८

महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक बाबत अचूक विधान निवडा.

१) महाराष्ट्रात प्रमुख शहरे जोडलेल्या रस्त्यांना ‘राष्ट्रीय महामार्ग’ असे म्हणतात.

२) पूर्व जलद राजमार्गाची लांबी सुमारे २५ कि.मी. आहे.

३) चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, लातूर, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग नाहीत.

४) पश्चिम जलद राजमार्गाची लांबी सुमारे २४ कि.मी. आहे.

प्रश्न क्र. ९

अ) रौलेट कायदा हा एक असा कायदा होता की, ज्याद्वारे पोलिस कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करू शकत होते.

ब) रौलेट कायद्याद्वारे विशेष न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. या न्यायालयाला असीमित असे अधिकार देण्यात आले होते.

क) या न्यायालयाच्या निर्णयांवर अन्य कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नव्हते.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १०

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

१) भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे धावली.

२) भारतातील रेल्वे मार्गांच्या लांबीच्या ८.९% महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांची लांबी आहे.

३) नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एकही रेल्वे मार्ग नाही.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. ११

खालील विधाने लक्षात घ्या.

१) दिल्ली ते चेन्नई हा ग्रंथ ट्रंक मार्ग म्हणून ओळखला जातो.

२) मूर्तिजापूर- अचलपूर, मूर्तिजापूर-यवतमाळ, पुलगाव-आर्वी हे नॅरोगेज रेल्वेमार्ग आहेत.

३) रुंद मार्ग (ब्रॉड गेज) या मार्गातील दोन रुळांमध्ये १.६७ मीटर अंतर असते.

४) महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतापासून निघालेल्या डोंगररांगा रेल्वे मार्गांना मर्यादित करतात.

वरील पर्यायापैकी कोणता पर्याय अचूक आहे?

१) १ व २
२) २ व ३
३) १, २ व ३
४) वरील सर्वच

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे :

प्रश्न क्र. १- ४
प्रश्न क्र. २- ४
प्रश्न क्र. ३- ४
प्रश्न क्र. ४- १
प्रश्न क्र. ५- २
प्रश्न क्र. ६- ४
प्रश्न क्र. ७- ४
प्रश्न क्र. ८- ३
प्रश्न क्र. ९- ४
प्रश्न क्र. १०-३
प्रश्न क्र. ११-४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.