scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : पर्यावरणीय समस्या म्हणजे काय? त्याची मुख्य कारणे कोणती?

पर्यावरण : या लेखातून पर्यावरणीय समस्यांविषयी जाणून घेऊ.

Environmental Issues
पर्यावरणीय समस्या म्हणजे काय? त्याची मुख्य कारणे कोणती? ( फोटो – freepik, लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

वृषाली धोंगडी

मागील लेखातून आपण पर्यावरणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांविषयीची माहिती घेतली. या लेखातून पर्यावरणीय समस्यांविषयी जाणून घेऊ. सजीवांचा त्याच्या पर्यावरणाशी ऐतिहासिक काळापासून संबंध येत आहे. मानवी संस्कृती, परंपरा व पर्यावरण यांचासुद्धा परस्परसंबंध आहे. परंतु, पर्यावरणात अशाश्वत व अनियंत्रित मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात.

sushma andhare on raj thackeray, sushma andhare toll issue, sushma andhare on health
“काही जण शिळ्या कढीला ऊत आणत असून…”, टोल मुद्द्यावरुन अंधारेंचा मनसेला टोला
eco friendly consumers behavioral economics
Money Mantra: इकोफ्रेंडली ग्राहक काळाची गरज
parineeti-chopra
लग्नामध्ये ‘या’ डिझायनरच्या लेहंग्यामुळे खुलणार परिणीती चोप्राचं सौंदर्य; कपड्यापासून दागिन्यांपर्यंतची माहिती समोर
shahrukhkhan-controversy-jawan
‘जवान’च्या ‘त्या’ डायलॉगवर होणाऱ्या राजकारणाबद्दल शाहरुखने केलं वक्तव्य; म्हणाला “देशाच्या भल्यासाठी…”

हेही वाचा – UPSC-MPSC : भूस्खलन आणि हिमस्खलनाची नेमकी कारणे कोणती? भारतातील कोणत्या भागात सर्वाधिक घटना घडतात?

पर्यावरणीय समस्या उदभवण्यास कारणीभूत घटक पुढीलप्रमाणे :

१) वाळू उत्खनन : वाळू उत्खनन ही वाळू आणि खडी काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. ही प्रथा पर्यावरणीय समस्या बनत आहे. उदाहरणार्थ- नदीला त्याचा मार्ग बदलण्यास भाग पाडणे. कारण- वाळू व दगड नदीचा मार्ग बदलण्यापासून रोखतात आणि बफर म्हणून काम करतात. त्यामुळे भूजल पातळीचाही ऱ्हास होतो. कारण- नदीपात्रावरील वाळू ही नदी आणि भूजलातील दुवा म्हणून काम करते.

२) जनुकीय अभियंता (Genetically Engineered) पिके व झाडे : जनुकीय तंत्रज्ञानाने एखाद्या सजीवाच्या जनुकीय पदार्थात दुसऱ्या एखाद्या सजीवात आढळणाऱ्या जनुकाचा प्रवेश घडवून आणून निर्माण केलेल्या सजीवास जनुकीय संशोधित जीव (Genetically Modified Organism) असे म्हणतात. उदा. बँसिलस् धुरिर्जेसिस (Bacillus Thuringiensis) या मृदेतील जीवाणूमध्ये आढळणारे बीटी जनुक (बॉलवॉर्म विरुद्धचे विष तयार करणारे जनुक) रिकॉम्बिनंट डीएनए या जैविक तंत्रज्ञानाने कापसाच्या पिकामध्ये प्रवेशित करून, ‘बीटी कॉटन’ हे जनुकीय संशोधित पीक निर्माण केले जाते. हे परकीय बीटी जनुक धारण करणाऱ्या या जनुकीय संशोधित/ट्रान्सजेनिक पिकांची पाने बॉलवॉर्मविरोधी विष आपल्या पानांमध्ये निर्माण करतात. ही पाने खाल्ल्याने बॉलवॉर्म मारले जातात. त्यामुळे वांगी लागवड चांगली होते. पण, त्याचा इतर कीटक प्राणी प्रजातींवर हानिकारक परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर मानवी आरोग्यावरदेखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

३) मोबाईल फोन टॉवर्समधून रेडिएशनचा मानव आणि वन्यजीवांवर प्रतिकूल प्रभाव : सेल फोन टॉवरवरील प्रत्येक अँटेना विद्युत-चुंबकीय शक्ती उत्सर्जित करतो. एक सेल फोन टॉवर अनेक ऑपरेटरद्वारे वापरला जात आहे. अँटेनांची संख्या जितकी जास्त तितकी जवळच्या भागात वीज तीव्रता असते. मानवी शरीराच्या तुलनेत पक्ष्यांचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ त्यांच्या शरीराच्या वजनापेक्षा तुलनेने जास्त असते; तसेच पक्ष्यांच्या शरीरात द्रवाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ते अधिक किरणोत्सर्ग शोषून घेतात.

४) संवेदनशील भागात तीर्थक्षेत्र पर्यटन : हिमालय हे प्राचीन काळापासून संतांची निवासस्थाने, तीर्थक्षेत्रे असलेले स्थान म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री-यमुनोत्री व हेमकुंड साहिब, मणिमहेश, ज्वाला देवी, चिंतापुर्णी, हिमाचल प्रदेशातील नयना देवी आणि जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी व अमरनाथ, सिक्कीममधील खेचोपली आणि इतर पवित्र तलाव विशेषतः महत्त्वाचे आहेत. दुर्दैवाने यापैकी बहुतेक ठिकाणी वाहतूक, निवास, कचऱ्याचा निचरा या पुरेशा सुविधांचा अभाव आहे. परिणामी त्यांच्या वहन क्षमतेच्या पलीकडे संवेदनशील परिसंस्था आणि सांस्कृतिक या क्षेत्रांच्या मूल्यांवर दबाव येत आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करतात?

पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाय : –

१) प्रमुख शहरे आणि गंभीर प्रदूषित क्षेत्रांसाठी कृती योजना तयार करणे आणि अंमलबजावणी करणे.
२) जागृती अभियानांतर्गत पर्यावरणाविषयी जनजागृती करणे.
३) सर्वसमावेशक धोरण तयार करणे.
४) महानगरपालिकेचे व्यवस्थापन, धोकादायक व जैववैद्यकीय कचरा यांचे व्यवस्थापन करणे.
५) हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षण केंद्रांचे नेटवर्क मजबूत करणे इत्यादी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc what is environmental issues causes and measures mpup spb

First published on: 02-10-2023 at 18:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×